27 C
Mumbai
Monday, October 3, 2022
घरविशेषम्हणून सुदृढ बालकाची आई कुपोषित मुलाच्या आईला भेटते

म्हणून सुदृढ बालकाची आई कुपोषित मुलाच्या आईला भेटते

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात मध्ये घेतली कुपोषणाच्या समस्येची दखल

Related

कुपोषणाविरुद्धच्या मोहिमेत सामील होण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी असलेल्या आपल्या मन की बात कार्यक्रमातून त्यांनी जनतेशी संवाद साधला. या ९२ व्या मन की बात कार्यक्रमात बाेलताना पंतप्रधान म्हणाले की, कुपोषणाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सामाजिक जागृतीचे प्रयत्न महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

आसाममधील बोंगई गावात प्रकल्प संपूर्ण हा एक वेगळा प्रकल्प चालवला जात आहे. त्याचा उद्देश कुपोषणाविरुद्ध लढा हा आहे आणि या लढ्याची पद्धतही अतिशय अनोखी असल्याचे सांगून पंतप्रधान माेदी म्हणाले की, या अंतर्गत अंगणवाडी केंद्रातील सुदृढ बालकाची आई दर आठवड्याला कुपोषित बालकाच्या आईला भेटून पोषणविषयक सर्व माहितीवर चर्चा करते. म्हणजेच एक आई दुसऱ्या आईची मैत्रीण बनते, तिला मदत करते, तिला शिकवते. या योजनेच्या मदतीने या भागात एका वर्षात ९० टक्क्यांहून अधिक बालकांमधील कुपाषण कमी झाले अाहे, कुपोषण दूर करण्यासाठी गाणी, संगीत आणि भजनांचाही उपयोग होऊ शकतो याची तुम्ही कल्पना करू शकता का?

मेरा बच्चा अभियानाला यश

मध्य प्रदेशातील दतिया जिल्ह्यात “मेरा बच्चा अभियान” सुरू करण्यात आले. याअंतर्गत जिल्ह्यात भजन-कीर्तनांचे आयोजन करण्यात आले होते, त्यात पोषण गुरू म्हणणाऱ्या शिक्षकांना पाचारण करण्यात आले होते. मटका कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये महिला अंगणवाडी केंद्रात मूठभर धान्य आणतात आणि या धान्यापासून शनिवारी ‘बालभोज’ आयोजित केला जातो. त्यामुळे अंगणवाडी केंद्रांमध्ये मुलांची उपस्थिती वाढल्याने कुपोषणाचे प्रमाणही कमी झाले असल्याकडं पंतप्रधानांनी लक्ष वेधलं कुपोषणाबाबत जनजागृती करण्यासाठी झारखंडमध्ये एक अनोखी मोहीम सुरू असल्याचे पंतप्रधान म्हणाले. झारखंडच्या गिरिडीहमध्ये साप आणि शिडीचा खेळ तयार करण्यात आला आहे. खेळाच्या माध्यमातून मुलांना चांगल्या आणि वाईट सवयींबद्दल माहिती मिळते.

हे ही वाचा:

आगामी सणांमध्ये तुम्ही ‘ही’ उत्पादने भेट द्या

गणेशोत्सवासाठी भाजपाकडून चाकरमान्यांना ५०० बसेस

…. पण नवाब मलिक आणि संजय राऊत बनू नका!

राहुल गांधींना सुनावत माजी खासदार एम. ए. खान यांचा काँग्रेसला रामराम

 

१-३० सप्टेंबर पाेषण महिना

कुपोषणाशी निगडीत अनेक नवनवीन प्रयोगांबद्दल सांगतोय कारण येत्या महिनाभरात सर्वांना या मोहिमेत सहभागी व्हायचे आहे .सप्टेंबर महिना सणांना समर्पित आहे तसेच पोषणाशी संबंधित एक मोठी मोहीम असल्याचं पंतप्रधानांनी सांगितलं. आपण दरवर्षी १ ते ३० सप्टेंबरपर्यंत पोषण माह साजरा करतो. कुपोषणाविरोधात देशभरात अनेक विधायक प्रयत्न केले जात आहेत. तंत्रज्ञानाचा उत्तम वापर आणि लोकसहभाग हा देखील पोषण अभियानाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे असल्याकडे पंतप्रधानांनी लक्ष वेधलं. १४ ते १८ वर्षे वयोगटातील मुलींना देखील सर्व विशेष जिल्हे आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पोशन अभियानाच्या कक्षेत आणण्यात आले आहे.

अन्य माेहीमांचीही महत्वाची भूमिका

कुपोषणाच्या समस्येचे निराकरण इतक्या पुरतेच मर्यादित नाही. या लढ्यात इतर अनेक उपक्रमही महत्त्वाची भूमिका बजावतात. उदाहरणार्थ, जल जीवन मिशन घ्या, भारत कुपोषणमुक्त करण्यात या मिशनचाही मोठा परिणाम होणार आहे. कुपोषणाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी सामाजिक जागृतीचे प्रयत्न महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,969चाहतेआवड दर्शवा
1,945अनुयायीअनुकरण करा
41,900सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा