काही दिवसांपूर्वी बांगलादेशचे पंतप्रधान तारीक रहेमान चीन भेटीवर गेले होते. यावेळी झालेल्या महत्वपूर्ण करारात विकासाच्या नावाखाली मंगोला बंदर बांगलादेशने चीनला बहाल करण्यात आले. हा उघड भारताची कुरापत काढण्याचा प्रयत्न होता.
भारताच्या परसदारात चीनला आणून बसवणारे अनेक करार बांगलादेशने रहेमान यांच्या दौऱ्या दरम्यान करण्यात आले आहेत. भारतासमोर बांगलादेशची ताकद तोळामासा आहे. खरे आव्हान चीनचे आहे.
ताज्या इंडोनेशिया भेटीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चीनला ‘नहले पे दहला’ दिला आहे. इंडोनेशियाचे साबांग बंदर आता भारत विकसित करणार आहे.
मलाक्का सामुद्रधनीत अत्यंत मोक्याच्या बिंदूवर हे बंदर आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इंडोनेशिया दौऱ्याला प्रचंड मोठा ‘चीन संदर्भ’ आहे. ६ ते ८ जुलै असा मोदींचा दौरा आहे. इंडोनेशियाचे पंतप्रधान प्रभावो सुबिआंतो यांनी मोदींचे जोरदार स्वागत केले.
इंडोनेशिया हा लोकसंख्येच्या दृष्टीने जगातील सगळ्या मोठा मुस्लीम देश. एका बाजूला इस्लामिक रिपब्लिक ऑफ पाकिस्तान चीनच्या मांडीवर बसलेला असताना इंडोनेशिया मात्र भारताच्या बाजूने झुकताना दिसतो आहे. चीनच्या दादागिरीने या दोन्ही देशांना घट्ट मित्र बनवले आहे.
दक्षिण चीन समुद्रात चीनची वाढती दादागिरी आणि हिंदी महासागरात पाय पसरवण्याची धडपड या पार्श्वभूमीवर भारत आणि इंडोनेशिया हे दोन मोठे लोकशाही देश एकत्र येत आहेत. अलिकडेच चीनच्या कडवट विरोधक मानल्या जाणाऱ्या जपानच्या पंतप्रधान साने ताकाईचि भारतात येऊन गेल्या. चीनला यामुळे प्रचंड मिर्च्या झोंबल्या. इंडोनेशिया भारताच्या जवळ आल्यामुळे चीन अधिकच धुमसणार आहे.
A few days ago, Bangladesh’s Prime Minister Tarique Rahman visited China. During this visit, under the guise of development cooperation, Bangladesh handed over the strategically important Mongla Port to China. This was an open attempt to provoke India.
During Rahman’s visit, Bangladesh signed several agreements that effectively invite China into India’s immediate neighborhood. Bangladesh itself is no match for India in terms of strength; the real challenge is China.
However, during his latest visit to Indonesia, Prime Minister Narendra Modi delivered a strong strategic counter to China. India will now develop Indonesia’s Sabang Port, which is located at a highly strategic point near the Strait of Malacca.
Prime Minister Narendra Modi’s visit to Indonesia carries significant strategic implications in the context of China. The visit, scheduled from July 6 to 8, was marked by a warm welcome from Indonesian Prime Minister Prabowo Subianto. Indonesia is the world’s largest Muslim-majority country by population.
While the Islamic Republic of Pakistan has increasingly aligned itself with China, Indonesia appears to be moving closer to India. China’s growing assertiveness has brought these two nations together.
Against the backdrop of China’s expanding aggression in the South China Sea and its efforts to extend its influence into the Indian Ocean, India and Indonesia—two major democracies—are strengthening their partnership.
Recently, Japan’s Prime Minister Sanae Takaichi, who is widely regarded as a strong critic of China, visited India, much to Beijing’s displeasure. With Indonesia now drawing closer to India, China’s concerns are likely to deepen even further.







