32 C
Mumbai
Monday, June 21, 2021
घर विशेष भारतात १३ कोटी डोसेस प्रतिमहिना तयार होणार

भारतात १३ कोटी डोसेस प्रतिमहिना तयार होणार

Related

सर्वोच्च न्यायालयात सरकारने दिली माहिती

भारतामध्ये कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. त्यापासून वाचण्यासाठी भारतात लसीकरणाच्या मोहिमेला सुरूवात झाली आहे. मात्र याबाबत सर्वोच्च न्यायालयात अधिक माहिती देताना सरकारने सांगितले की जुलै अखेर पर्यंत देशातील एकूण लसीचे उत्पादन १३ कोटी डोसेस प्रति महिना इतके वाढवण्यात येणार आहे.

हे ही वाचा:

सलग दुसऱ्या दिवशी देशातील कोविड रुग्णसंख्येत घट

कोविशिल्ड लसीमुळे मृत्युचा धोका ८० टक्क्यांनी कमी

अनंतनाग येथे तीन दहशवाद्यांचा खात्मा

तुमच्या मुलांना शाखेत पाठवा, देश वाचवा

सध्या भारताच्या लसीकरणाची मदार कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या दोन लसींवर आहे. त्यांच्या जोडीला आता रशियाची स्पुतनिक लस देखील भारतात दाखल झाली आहे. कोविशिल्डचे उत्पादन पुण्यातील सिरम इन्स्टिट्युट ऑफ इंडिया मध्ये केले जाते. ही संस्था आपले उत्पादन वाढवून प्रतिमहिना ६.५ कोटी डोसेस जुलै अखेरपर्यंत करणार आहे. त्याबरोबर ही क्षमता पुढे अजून देखील वाढवली जाणार आहे. सध्या त्यांची उत्पादन क्षमता पाच कोटी डोसेसची आहे.

सिरम प्रमाणेच हैदराबादची भारत बायोटेक ही कंपनी देखील लसीचे उत्पादन करते आहे. कोवॅक्सिन या संपूर्ण भारतीय बनावटीच्या लसीचे उत्पादन केले जाते.     सध्या भारत बायोटेक प्रतिमहिना केवळ ९० लाख डोसेस तयार करू शकतात. ही क्षमता वाढवून प्रतिमहिना दोन कोटी डोसेस केली जाणार आहे, तर जुलैपर्यंत हे उत्पादन वाढवून प्रतिमहिना ५.५ कोटी डोसेस केले जाणार आहे. त्यासाठी मिशन कोविड सुरक्षा अंतर्गत त्यांना सहाय्य केले जात असल्याचे देखील सांगितले जात आहे.

भारतात स्पुतनिक या लसीचे आगमन हैदराबाद येथील डॉ रेड्डी लॅबोरेटोरिजच्या मार्फत झाले. या लसीचे उत्पादन सध्या केवळ ३० लाख डोस आहे, ते जुलै अखेरीस वाढवून १.२ कोटी डोसेस पर्यंत नेले जाणार आहे.

मोदी सरकारने याशिवाय इतरही लसींना मान्यता दिली आहे. त्या देखील लवकरच भारतात आगमन करण्याची शक्यता आहे. भारताच्या लसीकरण कार्यक्रमाला बळकटी येण्यासाठी ही गोष्ट फायद्याची ठरणार आहे.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा