34 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरराजकारणतुमच्या मुलांना शाखेत पाठवा, देश वाचवा

तुमच्या मुलांना शाखेत पाठवा, देश वाचवा

Google News Follow

Related

अभिनेत्री कंगना रानौत हिने ‘तुमच्या मुलांना शाखेत पाठवा आणि देश वाचवा’ असे आवाहन देशवासियांना केले आहे. आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून कंगनाने हे आवाहन केले आहे. कोविडच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ करत असलेल्या सेवाकार्याने कंगना प्रभावित झाली आहे.

कोविडच्या दुसऱ्या लाटेत सध्या देश पिचला गेला आहे. रोज देशभरातील लाखो रूग्ण हे कोरोनाच्या कचाट्यात सापडत आहेत. अशात भारत सरकार आपली जबाबदारी पार पाडत आहेच पण यासोबतच अनेक स्वयंसेवी संस्था मदतीसाठी पुढे सरसावत आहेत. अशीच एक संघटना म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ.

‘कठीण समय येता संघ कामास येतो’ या उक्तीनुसार काम करणारी ही संघटना कोविडच्या महामारीतही मैदानात उतरून काम करताना दिसत आहे. संघाच्या माध्यमातून देशभरात अनेक उपक्रम राबवले जात आहेत. अनेक ठिकाणी कोविड सेंटर सुरू करण्यात आली आहेत. असेच एक १०० खाटांचे सेंटर नुकतेच भोपाळमध्ये सुरू करण्यात आले. याची बातमी कंगनाने आपल्या इंस्टाग्रामवर शेअर केली. त्यावेळी “मी माझ्या भाच्याला शाखेत पाठवायचा निर्णय घेतला आहे. तुम्ही पण तुमच्या मुलांना शाखेत पाठवा आणि देश वाचवा” असे कंगनाने म्हटले आहे.

या सोबतच कंगनाने पत्रकार दिपक चौरसिया यांच्या ट्विटचा फोटो शेअर केला आहे. ज्यात त्यांनी देशभर सुरू असलेल्या संघकार्याची आकडेवारी दिली आहे. त्यावर कंगनाने लिबरल गँगवर निशाणा साधला आहे. “जेव्हा केव्हा लिबरल लोक संघाचा अवमान करतील तेव्हा त्यांना याची आठवण करून देण्याची गरज आहे” असे कंगना म्हणाली आहे.

हे ही वाचा:

मुस्लिम संघटनांसोबतची आघाडी काँग्रेसला भोवली

कोविड काळात काझीच्या अंतिम दर्शनासाठी हजारोंची गर्दी

७० हजार कोटींच्या ठेवी असलेल्या पालिकेने मोफत लसीकरणाचा बोजा उचलावा

आरोग्य अधिकाऱ्याला शिवीगाळ, आमदार रणजीत कांबळेंविरुद्ध तक्रार दाखल

देशावर संकट आलेले असताना संघ कायमच मदतीसाठी अग्रणी राहिला आहे. कोविडच्या पहिल्या लाटेतही टेस्टिंग, अन्नवाटप, रूग्णसेवा, रक्तदान, प्लाझ्मादान अशा विविध उपक्रमांतून संघ स्वयंसेवक कार्यरत होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा