भारतीय मूळचे ४२ वर्षीय गौरव कुंदी यांच्या अटकेदरम्यान ऑस्ट्रेलियातील अॅडिलेडच्या पूर्व उपनगरात पोलिसांकडून क्रूरता करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पोलिसांनी त्यांना जमिनीवर पाडून त्यांच्या मानेवर गुडघा दाबला, ज्यामुळे ते आता जीवासाठी झुंज देत आहेत. स्थानिक मीडियानुसार, गौरव सध्या रॉयल अॅडिलेड रुग्णालयात दाखल असून, डोक्याला आणि मानेला गंभीर दुखापती झाल्यामुळे लाइफ सपोर्ट सिस्टमवर आहेत. दोन मुलांचे वडील असलेल्या गौरव कुंदी यांच्या कुटुंबियांनी सांगितले की, गंभीर इजा झाल्यानंतर ते बेशुद्ध झाले.
गौरव यांच्या पत्नी अमृतपाल कौर यांनी एक व्हिडिओ रेकॉर्ड केला आहे, ज्यामध्ये त्यांना पेनहॅम रोडवर पोलिसांनी जबरदस्तीने नेताना दाखवले आहे. व्हिडिओमध्ये गौरव ओरडून म्हणताना दिसतात, “मी काहीही चुकीचं केलं नाही आहे,” तर त्यांची पत्नी रडत त्यांची निर्दोषता सांगत आहे. कौर यांनी ऑस्ट्रेलियन ९ न्यूज ला सांगितले की, “मी फक्त १९ सेकंदांचाच व्हिडिओ रेकॉर्ड करू शकले, कारण मी घाबरले होते आणि गौरवसोबत जमिनीवर बसले. मी सतत म्हणत होते की तो ठीक नाहीये, कृपया असं करू नका, फक्त अॅम्ब्युलन्सला बोलवा.”
हेही वाचा..
नीती आयोगाने राज्यांशी संरचित सहभाग वाढवण्यासाठी केले कार्यशाळेचे आयोजन
तुर्कीच्या सेलेबी कंपनीचा मध्यस्थता अर्ज भारतात फेटाळला
आयसीइए कडून उद्योग-व्यापी उपक्रमाची सुरूवात
देशहित काँग्रेससाठी महत्त्वाचं नाही
डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे, “गौरवचा मेंदू पूर्णपणे डॅमेज झाला आहे. जर ब्रेन पुन्हा काम करू लागला तर त्यांना शुद्ध येईल, नाहीतर…कदाचित कधीच नाही.” ही घटना कशी घडली हे सांगताना कौर म्हणाल्या की, गौरव आणि त्यांच्यातील जोरदार वादामुळे रस्त्यावर गस्त घालणाऱ्या पोलिसांचे लक्ष गेले आणि त्यांनी चुकीने हे प्रकरण ‘घरगुती हिंसाचार’ समजले.
कौर पुढे म्हणाल्या, “मी फक्त त्याच्या मागे गेले आणि म्हणाले, ‘तू इथे काय करतो आहेस? चल घरी जाऊया. तू नशेत आहेस. तुझी तब्येत ठीक नाही. आपण घरी जाऊ.’ त्याने फक्त मला हलकेसे ढकलले…पण पोलिसांना वाटलं की तो माझ्यावर हल्ला करतो आहे. पण ते चुकीचे होते. तो फक्त नशेत होता आणि मोठ्याने बोलत होता, एवढंच.”
त्यांनी सांगितले की, गौरव यांना दुखापत तेव्हा झाली, जेव्हा पोलिसांनी त्यांचे डोके रस्त्यावर आणि गाडीवर आपटले. त्यांच्या मानेवर गुडघा मारण्यात आला.
कौर म्हणाल्या की, “मी पोलिसांना सतत सांगत होते की त्यांना आधीपासूनच आरोग्याच्या समस्या आहेत.” त्या पुढे म्हणाल्या, “त्या पोलिसाने त्याला रस्त्यावर खूप मारलं, त्यामुळेच त्याचा मेंदू डॅमेज झाला आहे. त्याच्या तब्येतीची परिस्थिती गंभीर आहे आणि त्याचं हृदयही काम करत नाही. मी फक्त रस्त्यावर बसून देवाकडे प्रार्थना करत आहे. मी काहीच करू शकत नाही.”
