भारतीय महिलांनी विश्वचषक जिंकून शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहेच पण क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक बक्षीस रक्कमही मिळवली. भारतीय संघाला ३९.७८ कोटी रुपये इनाम मिळणार आहे.
ही रक्कम संपूर्ण स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या 123 कोटिंमधून मिळणार आहे, ज्याची घोषणा आयसीसीने स्पर्धेपूर्वी केली होती. ही रक्कम २०२२ च्या न्यूझीलंडमधील स्पर्धेतील रकमेच्या तुलनेत तब्बल २९७% आहे.
हे ही वाचा:
दिव्यांग हक्कांचे संरक्षण : आयुक्तांची कार्यपद्धती निश्चित
मुळ्याचे फायदे : औषधी गुणांनी भरलेले भांडार
ममतादीदी म्हणतात घुसखोरावर कारवाई करू नका
स्वप्नात देवाचे दर्शन होणे हे कसले संकेत ?
उपविजेता दक्षिण आफ्रिका संघाला १९.८८कोटी मिळतील. उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या प्रत्येक संघाल ९.९४ कोटी मिळतील
बीसीसीयदेखील महिला संघाला पुरुष संघाप्रमाणेच बक्षीस आणि बोनस देण्याचा विचार करत आहे.
बीसीसीआयच्या च्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, बीसीसीआय पुरुष आणि महिला खेळाडूंसाठी समान मानधनाच्या धोरणाला पाठिंबा देतो. त्यामुळे जर आमच्या मुलींनी विश्वचषक जिंकला, तर त्यांना मिळणारे बक्षीसही पुरुष जागतिक विजेत्यांपेक्षा कमी नसेल. परंतु विजयापूर्वी घोषणा करणे योग्य नाही.”
रोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखालील पुरुष संघाला T20 विश्वचषक २०२४ जिंकल्यानंतर १२५ कोटी देण्यात आले होते, आणि आता महिला संघाच्या ऐतिहासिक विजयामुळे एवढीच रक्कम दिली जाईल.
नवी मुंबईतील जल्लोष सुरू असताना, भारताचा हा ऐतिहासिक विजय आणि विक्रमी बक्षीस रक्कम महिला क्रिकेटसाठी नवे पर्व ठरला आहे. हा क्षण आयसीसी च्या “जागतिक दर्जाचा महिला विश्वचषक” आणि “दीर्घकालीन विकासासाठीच्या वचनबद्धते”चे प्रातिनिधिक चिन्ह आहे.







