पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध घेतलेल्या कठोर निर्णयामध्ये सिंधू पाणी कराराचा समावेश होता. सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर संतापलेल्या पाकने भारताला धमक्या देण्यास सुरुवात केली होती. मात्र, भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’अंतर्गत केले कारवाई पाहून पाक नरमला. भारता बरोबरच्या युद्धात पराभव झाल्यानंतर सिंधू पाणी करारावरून पाकने भारताकडे विनंती केली आहे. सिंधू पाणी करार स्थगित करण्याच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन पाकिस्तानने केले. दरम्यान, पाकने भारताला केलेल्या विनंतीवरून भाजपा आमदार अतुल भातखळकर यांनी पाकिस्तानवर टीका केली आहे. या बरबादीसाठी पाकिस्तान स्वतःजबाबदार असल्याचे भातखळकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सिंधू करारबाबत पाकिस्तानने भारताला आपल्या निर्णयावर पुनर्विचार करण्याचे आवाहन केले आहे. काल (१४ मे) पाकिस्तानच्या जलसंपदा मंत्रालयाने भारताच्या जलशक्ती मंत्रालयाला तसे पत्र लिहिले. पाकिस्तानच्या जलसंपदा मंत्रालयाने परराष्ट्र मंत्रालयाला लिहिलेल्या पत्रात म्हटले की, करार थांबवण्याच्या निर्णयामुळे देशात संकट निर्माण होऊ शकते.
हे ही वाचा :
भारत वन क्षेत्र वाढवणाऱ्या जगातील मोजक्या देशांमध्ये !
बॉर्डर २’ च्या निर्मात्या निधी दत्ता यांनी खुलेपणाने काय बोलल्या ?
“कर्नल सोफिया कुरैशी यांना सलाम!”
दरम्यान, सिंधू करारबाबत जलशक्ती मंत्री सीआर पाटील म्हणाले होते, सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानात पोहोचू नये यासाठी सरकारने तीन योजना जाहीर केल्या आहेत, जी अल्पकालीन, मध्यकालीन आणि दीर्घकालीन अशी आहे. पाण्याचा एक थेंबही वाया जाऊ नये यासाठी व्यवस्था केली जाईल.
यासह भारताने स्पष्ट केले आहे की, पाकिस्तान दहशतवादाला पाठिंबा देण्याचे सोडून देत नाही तोपर्यंत सरकार सिंधू पाणी करार स्थगित ठेवेल. पंतप्रधान मोदीही म्हणाले, “दहशतवाद आणि चर्चा एकाच वेळी होऊ शकत नाहीत. दहशतवाद आणि व्यापार एकाच वेळी होऊ शकत नाहीत. पाणी आणि रक्त एकत्र वाहू शकत नाही.”
तूच आहेस तुझ्या बरबादीचा शिल्पकार…
सिंधू जलवाटप कराराला स्थगिती देऊन भारताने केलेल्या अचूक कोंडीमुळे पाकिस्तान रडकुंडीला येऊन विनवण्या करतोय.
भारताला हवे असलेले सगळे आतंकवादी हवाली करून आणि PoK रिकामा करून आपली सुटका करुन घेण्याचा एकमेव मार्ग पाकिस्तानकडे उरलाय.
शुभस्य… pic.twitter.com/Sf5MrGOgDe— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 15, 2025
