36 C
Mumbai
Wednesday, May 15, 2024
घरविशेषचेन्नईचे धडाक्यात अव्वल चार संघांमध्ये पुनरागमन!

चेन्नईचे धडाक्यात अव्वल चार संघांमध्ये पुनरागमन!

२०० धावांचे लक्ष्य गाठण्यात हैदराबाद पुन्हा अपयशी

Google News Follow

Related

चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडिअममध्ये रविवारी रंगलेल्या सामन्यात चेन्नईने हैदराबादचा ७८ धावांनी पराभव केला. या विजयामुळे गतविजेत्या चेन्नईने गुणतक्त्यात पुन्हा पहिल्या चार संघांत स्थान मिळवले आहे. कर्णधार ऋतुराज गायकवाडच्या ९८ धावा आणि तुषार देशपांडे याच्या गोलंदाजीमुळे चेन्नईचा विजय सुकर झाला.पहिल्यांदा फलंदाजी करताना २८७ आणि २७७ धावा करणाऱ्या हैदराबादला सलग दुसऱ्या सामन्यांत २०० धावांचे लक्ष्य गाठता आले नाही. लक्ष्याचा पाठलाग करताना हैदराबादने संपूर्ण आयपीएल हंगामात आतापर्यंत केवळ एकदाच हे लक्ष्य पार केले आहे.

गेल्या आठवड्यात बेंगळुरूने ठेवलेले २०७ धावांचे लक्ष्य गाठताना हैदराबादचा संघ १७१ धावांतच आटोपला होता. रविवारी हैदराबादला १८.५ षटकांत केवळ १३४ धावाच करता आल्या. यंदाच्या हंगामात सर्व खेळाडू बाद होण्याची त्यांची ही पहिलीच वेळ ठरली. ७८ धावांनी पराभव झाल्यामुळे त्यांच्या नेट रनरेटवरही परिणाम होणार आहे.
चेन्नईच्या गोलंदाजांनी या सामन्यात कमाल केली. तुषार देशपांडे याने धोकादायक ट्रेव्हिस हेड, अभिषेक शर्मासह चार विकेट घेतल्या. तर, मुस्तफिझुर रेहमान आणि मथिशा पथिराना यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. फिरकीपटू रवींद्र जडेजा याने एक विकेट घेऊन चार षटकांत २२ धावा दिल्या.

हे ही वाचा:

धावगतीवरून टीका करणाऱ्यांना कोहलीचे सडेतोड प्रत्युत्तर!

मीरारोडमध्ये लव्ह जिहाद; बिर्याणीमधून गुंगीचे औषध देऊन बलात्कार, धर्म बदलण्याची सक्ती!

६०२ कोटी रुपयांच्या ड्रग्जसह १४ पाकिस्तानी तस्करांना अटक!

औरंगजेब सांगा कुणाचा ?

ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांना सलग दुसऱ्या सामन्यात संघाच्या आशा पूर्ण करण्यात अपयश आले. त्यामुळे एडन मार्कम आणि हेन्रीच क्लासेन यांच्यावरील दबाव वाढला. तुषार देशपांडे याने पॉवरप्लेमध्येच हेड आणि अभिषेकच्या विकेट घेऊन हैदराबादचे कंबरडेच मोडले.चेन्नईच्या जलदगती गोलंदाजांनी पहिल्याच षटकात दोन विकेट घेतल्या. अनमोलप्रीत सिंग पहिल्याच चेंडूवर शून्यावर बाद झाला. ऋतुराज गायकवाड ९८वर बाद झाला. त्याने ५७ चेंडूंत ही कामगिरी केली.

त्याने गेल्या आठवड्यात लखनऊविरोधात १०६ धावा केल्या होत्या. अजिंक्य राहाणे अपयशी ठरत असल्याने चेन्नईला आता डेरिल मिचेल हा नवा हिरो गवसला आहे. न्यूझिलंडच्या या ताऱ्याने ३२ चेंडूंत ५२ धाव केल्या. त्याने सहा आणि सात चौकार लगावून १०७ धावांची भागीदारी केली.शिवम दुबेने २० चेंडूंत ३९ धावा करून कळस चढवला. त्याने चार उत्तुंग षटकार खेचले. चेन्नईचा पुढील सामना १ मे रोजी चेपॉक स्टेडिअमवर रंगणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा