27 C
Mumbai
Thursday, December 9, 2021
घरविशेष'आरोग्य' बिघडले; विद्यार्थ्याला दिली तब्बल ३४ हॉलतिकीट

‘आरोग्य’ बिघडले; विद्यार्थ्याला दिली तब्बल ३४ हॉलतिकीट

Related

आरोग्य विभागाच्या परीक्षांचा गोंधळ संपायचे नाव घेत नसून आरोग्य विभागाच्या गट ड पदासाठी रविवारी राज्यभरात परीक्षा होणार आहेत. याच परीक्षेसाठी बीडमधील एका उमेदवाराच्या नावे तब्बल ३४ हॉलतिकिटे आली आहेत. प्रत्येक हॉलतिकीटवर परीक्षा केंद्र आणि बैठक क्रमांक वेगवेगळा आहे. या निमित्ताने आरोग्य विभागाचा गोंधळ आणि भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.

बीड तालुक्यातील शहाबाजपूर येथे राहणाऱ्या पृथ्वीराज गोरे या विद्यार्थ्याने ऑगस्ट महिन्यात गट ड पदासाठी ऑनलाईन अर्ज केला होता. यामध्ये त्याने परीक्षा केंद्रासाठी औरंगाबाद विभागाला प्राधान्य दिले होते. दरम्यान रविवारी होणाऱ्या परीक्षेसाठी पृथ्वीराज गोरे या उमेदवाराच्या नावाने ३४ हॉलतिकीट आले असून प्रत्येक हॉलतिकिटावरील परीक्षा केंद्र आणि बैठक क्रमांक वेगवेगळा आला आहे. यामुळे उमेदवाराने नक्की कोणत्या केंद्रावर परीक्षा द्यायची असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

हे ही वाचा:

राष्ट्रवादीचा पोपट रोजच बोलतो

एसटीला गळफास घेऊन आणखी एका चालकाने गमावले प्राण

रिझर्व्ह बँकेला तीन वर्षासाठी नवी ‘शक्ती’

पंतप्रधान मोदी जाणार देवभूमीत! बाबा केदारनाथचे घेणार आशीर्वाद

यापूर्वी आरोग्य विभागाच्या गट क पदासाठी परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेदरम्यान उमेदवारांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला होता. सुरुवातील परीक्षा घेणाऱ्या कंपनीच्या अकार्यक्षमतेमुळे परीक्षा एक दिवस आधी रद्द करण्याची नामुष्की सरकारवर आली होती. त्यानंतर पुढे ढकलेल्या परीक्षेच्या हॉलतिकिटांमध्ये गोंधळ होऊन विद्यार्थ्यांना प्राधान्यानुसार परीक्षा केंद्रे देण्यात आली नव्हती. अखेर परीक्षेच्या दिवशीही काही परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका उशिरा पोहचल्याच्या तक्रारी उमेदवारांनी केल्या होत्या.

आता हॉलतिकीटामध्ये झालेल्या गोंधळामुळे पुन्हा एकदा आरोग्य विभागाचा भोंगळ कारभार समोर आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
1,516अनुयायीअनुकरण करा
4,940सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा