26 C
Mumbai
Saturday, December 9, 2023
घरविशेषकेरळमध्ये होते इस्रायलमधील पोलिसांच्या गणवेशांची निर्मिती

केरळमध्ये होते इस्रायलमधील पोलिसांच्या गणवेशांची निर्मिती

ओलिक्कल यांच्या कन्नूर युनिटला आऊटसोर्स केले आहे

Google News Follow

Related

इस्रायल आणि हमास यांच्या दरम्यान घनघोर लढाई सुरू असताना दूर केरळच्या कन्नूरमधील कूथूपरम्बा भागातील मार्यन एपीरेलमध्येही युद्धसदृश्य परिस्थिती आहे. मार्यन कंपनीचे संचालक थॉमस ओलिक्कल हे कुठेही गाझाजवळ नाहीत. मात्र युद्धाची बातमी ऐकताच ते आणि त्यांची सुमारे १५०० जणांची बहुतांश महिलांचा समावेश असणारी टीम युद्धपातळीवर कामाला लागली आहे. याला कारणही असेच आहे, इस्रायलच्या पोलिसांचा गणवेश करण्याचे काम येथे चालते.

 

‘ऑलिव्ह ग्रीन रंगाची स्ट्रेचेबल पँट आणि शर्टची गरज नोंदवण्यात आली आहे. दरवर्षी इस्रायलकडून १२ हजार गणवेशांची ऑर्डर येते. मात्र प्रशिक्षणासाठी ही ऑर्डर आधीच देण्यास त्यांना सांगण्यात आले आहे,’ असे ऑलिक्कल यांनी सांगितले. या कारखान्यातून इस्रायलचे पोलिस आणि तुरुंग अधिकाऱ्यांना सन २०१५पासून गणवेशांचा पुरवठा केला जातो. या ऑर्डरसाठी लागणाऱ्या कापडाची सध्या निर्मिती होत आहे. ‘इस्रायली पोलिस दलाच्या विविध विभागांतील कर्मचाऱ्यांसाठी डार्क नेव्ही, आकाशी निळा आणि पुसट हिरवा अशा तीन वेगवेगळ्या रंगांचे शर्ट आम्ही पुरवतो. मात्र आतापर्यंत आम्हाला इस्रायली लष्कराकडून कोणतीही ऑर्डर न मिळाल्याचेही ते स्पष्टपणे नमूद करतात.

हे ही वाचा:

द. आफ्रिकेचा केशव महाराज ‘ओम’ लिहिलेल्या बॅटने होता खेळत; फोटो व्हायरल

ड्रीम ११ वर दीड कोटी जिंकलेले पीएसआय झेंडे निलंबित

धक्कादायक! नेदरलँड्सने दक्षिण आफ्रिकेला नमविले

मुंबईत सैराट चित्रपटाची पुरावृत्ती; नव जोडप्याची हत्या, दोन्ही मृतदेह वेगवेगळ्या ठिकाणी टाकले

एका इस्रायली कंपनीला त्यांच्या सुरक्षा दलाकडून ही ऑर्डर मिळाली आहे. त्यानंतर या कंपनीने हे काम ओलिक्कल यांच्या कन्नूर युनिटला आऊटसोर्स केले आहे. केरळच्या या कारखान्यातून अन्य देशांनाही कपडे शिवून पाठवले जातात. त्यामुळे तेल अविवमधील या कंपनीने त्यांना गाठले असावे, अशी शक्यता ओलिक्कल यांनी व्यक्त केली. ‘इस्रायलच्या पोलिस दलातील दोन उच्चस्तरीय अधिकारी, एक डिझायनर आणि एक क्वालिटी कंट्रोलर आमच्या फॅक्टरीत आले होते. ते सुमारे १० दिवस येथे मुक्कामाला होते. त्यानंतर त्यांनी पॅटर्न, फिटिंग आणि अन्य बाबी अंतिम केल्यानंतरच ते मायदेशी परतले. आम्ही थेट पोलिसांशी करार करतो आणि त्यांना पुरवठा करतो. अर्थात या दरम्यान ही निविदा घेणाऱ्या कंपनीचा माणूसही सोबत असतो,’अशी माहिती ओल्लिकल यांनी दिली.

 

प्रशिक्षणार्थींचे शर्ट कॉटनचे तर, पँट्स पॉली कॉटनच्या असतात. ‘पोलिसांसाठी स्पेशल पॉलिस्टरचे कापड वापरले जाते. हे कापड अमेरिकेच्या पुरवठादाराकडूनच घेणे बंधनकारक आहे. तर, प्रशिक्षणार्थी आणि तुरुंग कर्मचाऱ्यांचे कापड आमच्याकडून बनवले जाते,’ असे त्यांनी सांगितले.

 

ओलिक्कल यांची कंपनी दर वर्षी पोलिसांचे एक लाख गणवेश आणि तुरुंग अधिकाऱ्यांच्या २५ ते ४० हजार गणवेशांचा पुरवठा करते. सर्व गणवेश उत्तम गुणवत्तेचे असतात आणि जापनीज मशिनवर तयार केलेले असतात. ओलिल्कल यांची कंपनी केवळ इस्रायललाच गणवेश पुरवत नाही. तर, कुवेतचे सुरक्षा दल, कतारचे पोलिस आणि लष्कर तसेच सौदी अरेबिया आणि फिलिपाइन्स लष्कराचे गणवेशही येथे तयार होतात. अमेरिकेतील मिनिपोलिस पोलिसांनीही त्यांना संपर्क साधला आहे, मात्र केरळच्या कंपनीने अद्याप त्यांची ऑर्डर घेतलेली नाही.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
112,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा