27 C
Mumbai
Monday, November 28, 2022
घरविशेषलालू यादवांना त्यांची कन्या देणार किडनी

लालू यादवांना त्यांची कन्या देणार किडनी

राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यांच्यावर या महिन्याच्या अखेरीस सिंगापूरमध्ये किडनी प्रत्यारोपण होणार.

Google News Follow

Related

राष्ट्रीय जनता दल प्रमुख लालू प्रसाद यांच्यावर या महिन्याच्या अखेरीस सिंगापूरमध्ये किडनी प्रत्यारोपण होणार. सिंगापूरमध्ये राहणारी त्यांची दुसरी मुलगी रोहिणी आचार्य यांची वैद्यकीय चाचण्यांच्या परिणार्थ अँटीबॉडी जुळण्यानंतर दाता म्हणून निवड करण्यात आली आहे.

कौटुंबिक सूत्रांनी सांगितले की रोहिणीने अवयवदान करण्यापूर्वी आवश्यक असलेली वैद्यकीय प्रक्रिया महिनाभरापूर्वीच पार पाडली आहे, असे सांगितल्यानंतर विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रोहिणीचे कौतुक झाले. “तिच्या सर्व आवश्यक चाचण्या झाल्या आहेत. आता लालू प्रसाद यादव २४ नोव्हेंबरला किंवा त्याच सुमारास सिंगापूरला जाण्याची शक्यता आहे. आठवडाभरानंतर ते किडनी प्रत्यारोपण करतील, असे लालू प्रसाद यादव कुटुंबीयांच्या निकटवर्ती राष्ट्रीय जनता दल नेत्याने सांगितले. ते पुढे म्हणाले की, प्रत्यारोपण झाल्यावर लालू प्रसाद यादव ह्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्य सिंगापूरला जाण्याची अपेक्षा आहे. यामध्ये लालू प्रसाद यादव ह्यांच्या पत्नी आणि माजी मुख्यमंत्री राबडी देवी आणि त्यांच्या इतर मुलांचा समावेश आहे. वडिलांच्या प्रत्यारोपणाच्या वेळी उपमुख्यमंत्री तेजस्वी प्रसाद यादव यांनीही भेट देण्याची शक्यता जास्त आहे. त्यांच्या पक्षाचे नेतेही सिंगापूरला त्यांची भेट घेतील असे सूत्रांद्वारे कळले .

सिंगापूरमध्ये जवळपास पंधरवडा घालवून लालूजी २४ ऑक्टोबरला भारतात परतले. तेथे त्यांनी तज्ञांचा सल्ला घेतला आणि त्यांची मते घेतली. लालू प्रसाद यादव ह्यांचा हा दुसरा सिंगापूर दौरा असेल आणि या दौऱ्यात त्यांचे प्रत्यारोपण होणार आहे. प्रत्यारोपणानंतर भारतात परतण्याबद्दल काही फारशी माहिती नाही, कारण ते त्याच्या बरे होण्यावर अवलंबून आहे, असे डॉक्टरांनी सांगितले.” प्रत्यारोपणानंतर रुग्णाला किमान १० दिवस रुग्णालयात ठेवले जाते आणि रोगप्रतिकारक औषधे जास्त काळ चालू राहतात. “दात्याला अनेक तपासण्या कराव्या लागतात, परंतु ह्युमन ल्युकोसाइट्स प्रतिजनआणि क्रॉसमॅच हे सर्वात महत्त्वाचे आहेत. दाता आणि प्राप्तकर्ता यांच्यात अँटीबॉडी जुळण्याची शक्यता किती आहे हे पाहिला बघितलं जात. मुलींच्या बाबतीत, ते जुळण्याची शक्यता ५०% आहे. अशा आवश्यक पूर्व चाचण्या १० ते १५ दिवसांत पूर्ण केल्या जातात”, रुबन रुग्णालयातील नेफ्रोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. पंकज हंस म्हणाले.

हे ही वाचा:

मोरबी दुर्घटनेत प्राण वाचवणाऱ्या माजी आमदाराला भाजपाकडून बक्षीस

शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८६५ वधारला तर निफ्टीतही वाढ

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘ती’ ऐतिहासिक तलवार येणार महाराष्ट्रात?

लालू प्रसाद यादव यांना किडनीच्या समस्येशिवाय मधुमेहाचाही आणि रक्तदाबाचाही त्रास आहे. हंस म्हणाले की, मधुमेह आणि रक्तदाबातील चढउतार ही मूत्रपिंडाच्या आजारामागील प्रमुख कारणे आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,952चाहतेआवड दर्शवा
1,975अनुयायीअनुकरण करा
52,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा