27 C
Mumbai
Monday, November 28, 2022
घरक्राईमनामाजॅकलीन फर्नांडिसला मिळाला आणखी थोडा दिलासा

जॅकलीन फर्नांडिसला मिळाला आणखी थोडा दिलासा

पटियाला हाऊस कोर्ट देणार १५ नोव्हेंबरला निकाल

Google News Follow

Related

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पटियाला हाऊस कोर्टातून मोठा दिलासा मिळाला आहे. सुकेश चंद्रशेखरशी संबंधित २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला न्यायालयाने १५ नोव्हेंबरपर्यंत संरक्षण दिले आहे. या अभिनेत्रीच्या जामीन अर्जावर न्यायालय आता १५ नोव्हेंबरला निकाल देणार आहे. १० नोव्हेंबर रोजी न्यायालयाने सर्व पक्षकारांचे म्हणणे ऐकून घेत निर्णय राखून ठेवला होता.

मनी लाँड्रिंगशी संबंधित सर्व आरोपी तुरुंगात असताना जॅकलिन फर्नांडिसला जामीन का द्यावा? अंमलबजावणी संचालनालयाने अभिनेत्रीच्या जामीन अर्जाला विरोध केला, कारण तिने देशातून पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी त्यांनी तपासात सहकार्यही केले नाही. अशा परिस्थितीत अभिनेत्रीला जामीन मिळू नये असा युक्तिवाद गुरुवारी, अंमलबजावणी संचालनालयाने पटियाला हाऊस न्यायालयात सुनावणीदरम्यान केला होता.

हे ही वाचा:

शेअर बाजारात तेजी, सेन्सेक्स ८६५ वधारला तर निफ्टीतही वाढ

छत्रपती शिवाजी महाराजांची ‘ती’ ऐतिहासिक तलवार येणार महाराष्ट्रात?

मुख्यमंत्री, पंतप्रधान सडक योजनेतून राज्याला ४०० कोटी

संजय राऊत फडणवीसांना भेटणार; मातोश्रीवर संशयाचा ९ किमी लांबीचा ढग

सध्या ही अभिनेत्री मनी लाँड्रिंग प्रकरणात अंतरिम जामिनावर बाहेर आहे. त्याच्यावर सुकेश चंद्रशेखरकडून करोडोंच्या भेटवस्तू घेतल्याचा आरोप आहे. सुकेशचे सत्य माहीत असूनही जॅकलीनने त्याच्याशी जवळीक साधली. सुकेशला आधी नोरा फतेहीशी लग्न करायचे होते, असे म्हटले जाते. पिंकीच्या माध्यमातून सुकेश जॅकलिनला खूप भेटवस्तू पाठवत होता. अंमलबजावणी संचालनालयाने  न्यायालयात सांगितले की, अभिनेत्रीने हे कबूल केले आहे आणि इतरांना पुराव्यांशी छेडछाड करण्यास, पुरावे नष्ट करण्यास सांगितले होते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,952चाहतेआवड दर्शवा
1,975अनुयायीअनुकरण करा
52,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा