29 C
Mumbai
Saturday, April 27, 2024
घरविशेषवाघ आणि त्याची मावशी विहिरीत पडली नंतर जे घडलं ते...

वाघ आणि त्याची मावशी विहिरीत पडली नंतर जे घडलं ते…

मांजर आणि बिबट्याचा विहिरीत पडल्याचा व्हिडिओ व्हायरल

Google News Follow

Related

सध्याच्या विविध समाज माध्यमांच्या वर आपण अनेक फोटो, व्हिडिओ व्हायरल झालेले बघतो आपल्याला काही अपील झाले तर त्याचा आपण आनंद द्यायला त्वरित एखाद्या ग्रुपवर किंवा मित्रमैत्रिणिंना फॉरवर्ड करतो असाच एक भन्नाट व्हिडिओ एका मांजराचा आणि बिबट्याचा आपल्याला बघायला मिळत आहे.  नाशिकमध्ये एक बिबट्या एका मांजराची शिकार करण्यासाठी त्याच्या मागे जाऊन पाठलाग करत होता आणि पाठलाग करता करता मांजर आणि बिबट्या दोघेही विहिरीत पडले. व्हीडिओत ते दिसते.  त्यानंतर जीव वाचवण्यासाठी दोघेही कशी धडपड करत आहेत तेच आपल्याला या व्हिडिओतून दिसत आहे.

सिन्नर तालुक्यातल्या टेम्भूर वाडी आशापूर इथली ही घटना आहे. आधी मांजर विहिरीत पडली आणि त्यानंतर बिबट्या सुद्धा तिचा पाठलाग करत त्या विहिरीत पडला. सकाळी सगळ्या लोकांना यांना विहिरीत बघून आश्चर्य वाटले आणि बिबटयाला बघायला लोकांनी गर्दी केली. विशेष म्हणजे या विहिरीत असलेल्या लोखंडी गजाचा आधार घेऊन बिबट्या तग धरून बसला होता तर मांजर काही वेळ पोहून आपला जीव वाचवत होती तर काही वेळेस ती गजाचा आधार घेत जीव वाचवत होती. व्हिडिओ मध्ये आपण बघू शकतो की, स्वतःचा जीव वाचवत असताना मांजर बिबट्याला खेळवत आहे असे आपल्याला वाटते जणू काही वाघाला ती सांगत होती कितीही झाले तरी ‘मी तुझी मावशी आहे’.

हे ही वाचा:

रेल्वेच्या ओव्हरहेड व्हॅनने आपल्याच ४ कर्मचाऱ्यांना चिरडले

लोकसभा सचिवालयाची राहुल गांधी यांना हक्कभंगाची नोटीस

मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या चावीमुळे बंजारा समाज विकासाच्या मार्गावर

महापालिकेसाठी भाजप मिशन १५० घोषित

मंगळवारी सकाळी विहिरीत पडलेल्या या बिबट्या आणि मांजराच्या  गुरगुरण्याच्या आवाजामुळे ग्रामस्थांनी विहिरीत डोकावून पाहिले तेव्हा बिबट्या आणि मांजर विहिरीत पडल्याचे त्यांच्या लक्षात आले. वनविभागाला माहिती दिल्यावर वन विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी तासाभरातच घटनास्थळी दाखल झाले आणि अथक प्रयन्त करून या दोघा मुक्या प्राण्यांचा जीव वाचवला आहे.

वरिष्ठ वन विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, अडीच वर्षांची मादी बिबट्या विहिरीतील पाण्याच्या पंपाला असलेल्या पाइपवर बसली होती तर मांजरीला काहीच पर्याय पाण्यात नव्हता पण कधी बिबटयाच्या शेपटीला धरत किंवा बिबट्यावर बसत मांजर आधार शोधात होती. बघ्यांनी बघताच आत एक टोपली टाकल्यावर मांजर त्या टोपलीत उडी मारून बसून विसावली आणि मग तिला बाहेर काढले त्यानंतर बिबट्याला मोहदरी वन उद्यानात नेऊन  जंगलात सोडण्यात आले. पण, या व्हायरल झालेल्या व्हिडिओ वरून नक्कीच म्हणावेसे वाटते शिकारी खुद यहाँ शिकार हो गया…

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
149,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा