25 C
Mumbai
Wednesday, March 29, 2023
घरराजकारणअश्विनीताई जगताप यांना विजयी करण्याचा मतदारांचा निश्चय!

अश्विनीताई जगताप यांना विजयी करण्याचा मतदारांचा निश्चय!

भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुधाकर भालेराव यांचा विश्वास

Google News Follow

Related

सध्या चिंचवड आणि कसबा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या प्रचाराचा धुरळा उडाला आहे. चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपाचे दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप उभ्या आहेत. त्यांच्या प्रचारयात्रेला भरघोस प्रतिसाद लाभत आहे. त्या प्रचारयात्रेत उपस्थितांना संबोधित करताना भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार सुधाकर भालेराव यांनी विश्वास व्यक्त केला की, मतदारांनी अश्विनीताईंना निवडून देण्यासाठी कंबर कसली    आहे.

ते म्हणाले की, प्रचारयात्रेत फिरत असताना प्रत्येकाच्या बोलण्यात एक जाणवत होते ते म्हणजे पिंपरी चिंचवडमधील कुटुंबे, नागरीक लक्ष्मणभाऊंनी कसे काम केले हे कौतुकाने सांगत होते. दोन अडीच तास सर्व भगिनी प्रचारयात्रेत नेटाने सहभागी झाल्या. त्यांचा कणखर पाठिंबा लाभला.  २६ फेब्रुवारीला अश्विनीताईंना विजयी केल्याशिवाय राहणार नाहीत, हा संकल्प सगळ्यांनी केला आहे. सगळ्यांनी घराघरात जाऊन प्रचार केला आहे. एकेका घरात जाऊन किती मतदार आहेत, त्यांच्या फोन नंबरसहित सगळी माहिती गोळा करण्यात आली आहे. चांगल्या पद्धतीने कामाची सुरुवात झाली आहे. भाजपाच्या माध्यमातून उत्साही पद्धतीने सगळे कार्यरत आहेत. बहुसंख्य मतदार अश्विनीताईंच्या मागे उभे आहे. त्यांना कुठलीही कमतरता भासणार नाही, असा विश्वास दिला आहे.

हे ही वाचा:

श्रद्धा, निकिता आणि आता पालघरमध्येही .. हत्या करून मृतदेह लपवला पलंगाखाली

आधी गळा आवळून खून .. मग मृतदेह ७२ तास फ्रिजमध्ये ठेवला!

खलिस्तान्यांचे कारस्थान; कॅनडातील श्रीराम मंदिरावर भारतविरोधी घोषणा

टीम इंडिया यत्र तत्र सर्वत्र!

ते म्हणाले की, एकेकाळी गरीब देश समजला जात होता. पण आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व देशाला लाभले आहे. विश्वगुरू बनविण्यासाठी देशाला सबका साथ सबका विकास सबका प्रयास हा मूलमंत्र घेऊन ते देशाला दिशा देत आहेत. भारताची प्रगती करत असताना पिंपरी चिंचवडमध्ये सकारात्मक विकास सुरू आहे. राज्यातील भारतीय जनता पार्टीचे खंबीर नेतृत्व आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील पालकमंत्री यांच्या नेतृत्वात भाजपा जोमाने काम करत आहे.

भालेराव म्हणाले की, आता सर्वांनी एकच निर्णय घ्यायचा आहे तो म्हणजे २६ तारखेला कमळ फुलासमोरचे बटन दाबायचे आहे. गल्ली ती दिल्लीपर्यंत आपले सरकार आहे. काँग्रेस राष्ट्रवादी भूलथापा देतात. महाविकास आघाडीच्या काळात त्यांचे गृहमंत्री जेलमध्ये गेले. काँग्रेसने गरीब श्रीमंत अशी दरी निर्माण केली. पण आता देशाचे नाव मोदींमुळे जगात झालेले आहे. विश्वावर भारत देश राज्य करेल असे चित्र तयार झाले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,876चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
65,600सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा