महाकुंभमेळ्यात स्थापन करण्यात आलेल्या ‘खोया-पाया’ केंद्रामुळे तब्बल २० हजार हून अधिक भाविक आपल्या कुटुंबाशी पुन्हा जोडले गेले आहेत. महाकुंभ मेळ्यात दररोज लाखोंची गर्दी होत असल्याने बऱ्याचदा कुटुंबांच्या सदस्यांची चुकामुक होते. त्यामुळे चुकामुक झालेल्या लोकांना आपल्या कुटुंबांशी पुन्हा जोडण्याचे काम ‘खोया-पाया’ केंद्र करते.
उत्तर प्रदेश सरकारने शनिवारी (१५ फेब्रुवारी) दिलेल्या माहितीनुसार, ‘खोया-पाया’ केंद्राच्या मदतीमुळे २०,१४४ हरवलेले भाविक त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा जोडले गेले आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणात महिलांचा समावेश असल्याचे सरकारने म्हटले आहे. याशिवाय, देशातील विविध राज्ये आणि नेपाळमधील भाविकांना त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा जोडण्यात पोलिसांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
हे ही वाचा :
ऑस्ट्रियामध्ये चाकू हल्ल्यात १४ वर्षीय मुलाचा मृत्यू
बलात्कार प्रकरणी मोहम्मद निशाल या युट्यूबरला अटक
कुंभ का कोई मतलब नहीं है, यह फालतू है!
नरेंद्र मोदींचा ‘राजीव गांधी’ करण्यासाठी आखला जात होता कट
अमृत स्नान महोत्सव मौनी अमावस्या (२८, २९ आणि ३० जानेवारी) दरम्यान गर्दीचे व्यवस्थापन करताना ‘खोया-पाया’ केंद्राने ८,७२५ हरवलेल्या व्यक्तींना त्यांच्या कुटुंबियांशी जोडण्याचे काम केले. मकर संक्रांतीच्या दिवशी (१३, १४ आणि १५ जानेवारी) वेगळे झालेल्या ५९८ भाविकांना आणि वसंत पंचमीच्या दिवशी (२, ३ आणि ४ फेब्रुवारी) वेगळे झालेल्या ८१३ भाविकांना त्यांच्या कुटुंबियांशी जोडले गेले.
याशिवाय, इतर स्नान उत्सव आणि सामान्य दिवसांमध्ये वेगळे झालेले १०,००० हून अधिक लोक देखील त्यांच्या कुटुंबियांशी पुन्हा जोडले गेले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ७ डिसेंबर २०२४ रोजी ‘खोया-पाया’ केंद्राची सुरुवात केली होती. महाकुंभ मेळा परिसरात १० ‘खोया-पाया’ केंद्र स्थापन करण्यात आली आहेत, जे संगम, झुंसी, अरैल, फाफामऊ आणि सेक्टर ३, ४, ५, ८, ९, २१, २३, २४ आणि प्रयागराज जंक्शन रेल्वे स्थानकाजवळ आहेत.