31 C
Mumbai
Sunday, October 4, 2026
घरविशेषमोहन भागवतांच्या दौऱ्यावरून ब्रिटनमध्येही पोटदुखी

मोहन भागवतांच्या दौऱ्यावरून ब्रिटनमध्येही पोटदुखी

लोकशाहीत विरोध स्वाभाविक, संवादासाठी आम्ही तयार - संघ

Google News Follow

Related

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत हे न्यूयॉर्कला असताना तेथे महापौर ममदानी यांच्यासह अनेकांच्या पोटात मुरडा उठला होता. आता सरसंघचालक मोहनराव भागवत ब्रिटनमध्ये जाणार आहेत, पण तिथेही अनेकजण पोटदुखीने बेजार झाले आहेत.  संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय संपर्क अभियानाचा भाग म्हणून भागवत ब्रिटन दौऱ्यावर असताना काही संघटनांनी त्यांच्या उपस्थितीला तीव्र विरोध दर्शविला आहे. मात्र, या विरोधावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने संयमी पण ठाम भूमिका घेत, लोकशाहीत प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असून विरोध करणाऱ्यांशीही संवाद साधण्यास संघ तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.

मोहन भागवत यांच्या ब्रिटनमधील कार्यक्रमांना विरोध करणाऱ्या काही संघटनांनी लंडनचे महापौर सादिक खान आणि ब्रिटिश प्रशासनाकडेही आपली भूमिका मांडली आहे. भागवत यांच्या कार्यक्रमांना सार्वजनिक व्यासपीठ किंवा जागा उपलब्ध करून देऊ नये, अशी मागणी या संघटनांनी केली आहे. या विरोधाच्या पार्श्वभूमीवर संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनील आंबेकर यांनी संघाची बाजू स्पष्ट करताना विरोधाला घाबरण्याचे कोणतेही कारण नसल्याचे म्हटले. लोकशाही व्यवस्थेत वेगवेगळे विचार, मतभेद आणि विरोध असणे स्वाभाविक आहे. ज्यांना विरोध करायचा आहे त्यांनी तो करावा; मात्र संघ चर्चेपासून किंवा संवादापासून मागे हटणार नाही, असा संदेश त्यांनी दिला.

हे ही वाचा:


सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा घसरण

खार्ग बेटाजवळ इराणी तेलवाहू जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला

आरबीआयची ₹७ लाख कोटींची खेळी

सोन्याने पाच वर्षांत करुन दिली तिप्पट कमाई

संघाच्या मते, भागवत यांच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश भारतीय समुदायाशी संवाद साधणे, संघाच्या शताब्दी वर्षातील कार्याची माहिती देणे आणि सामाजिक एकता, शांतता तसेच परस्पर सहकार्याचा संदेश पोहोचविणे हा आहे. ब्रिटनमधील विविध क्षेत्रांतील मान्यवर, धार्मिक प्रतिनिधी, शिक्षणतज्ज्ञ आणि भारतीय वंशाच्या नागरिकांशी भागवत संवाद साधत आहेत. विशेष म्हणजे एका बाजूला त्यांच्या दौऱ्याला विरोध होत असताना दुसऱ्या बाजूला ब्रिटनमधील अनेक हिंदू आणि सामुदायिक संस्थांनी या दौऱ्याचे स्वागत केले आहे. त्यामुळे भागवत यांचा ब्रिटन दौरा केवळ संघाच्या शताब्दी वर्षाचा आंतरराष्ट्रीय कार्यक्रम न राहता समर्थन आणि विरोधाच्या संघर्षामुळे चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. विरोधाचे सूर तीव्र होत असतानाही “विरोध करा, पण संवादाची दारे खुली आहेत,” अशी संघाने घेतलेली भूमिका या संपूर्ण वादात लक्षवेधी ठरत आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
336,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा