32 C
Mumbai
Thursday, April 25, 2024
घरविशेषमुख्यमंत्री सहाय्यता निधीतील ८०० कोटींपैकी ६०० कोटी खर्चच झाले नाहीत!

मुख्यमंत्री सहाय्यता निधीतील ८०० कोटींपैकी ६०० कोटी खर्चच झाले नाहीत!

Google News Follow

Related

कोविडच्या काळात मदतीसाठी आवाहन केल्यानंतर मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत कोविड खात्यात लोकांनी भरभरून आर्थिक सहाय्य केले. आजमितीला ७९९ कोटी जमा झाले असून ६०६ कोटींचा निधी वापराविना शिल्लक असल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांस मुख्यमंत्री सचिवालयाने दिली आहे. १९२ कोटीचे वाटप लक्षात घेता एकूण २५ टक्के रक्कम ही जमा निधीतून खर्च करण्यात आली आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुख्यमंत्री सचिवालयाकडे एकूण जमा निधी, खर्च करण्यात आलेला निधी आणि शिल्लक निधी याची माहिती विचारली होती. मुख्यमंत्री सचिवालयाच्या मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाने अनिल गलगली यांस कळविले की, एकूण ७९८ कोटी रक्कम जमा झाली असून आजमितीस ६०६ कोटी रक्कम शिल्लक आहे. १९२ कोटीचे वाटप केले आहे.

अनिल गलगली यांच्या मते हा निधी फक्त कोविड प्रयोजनासाठी असल्याने आतापर्यंत खर्च शत प्रतिशत करणे आवश्यक होते पण शासनाने २५ टक्के निधीचे वाटप केले आहे. इतका ६०६ कोटींचा निधी राखीव ठेवण्याचे नेमके प्रयोजन काय आहे? याची माहिती जनतेस देण्याची आवश्यकता आहे.

जमा रक्कमेपैकी जी रक्कम खर्च करण्यात आली आहे ती १९२ कोटी ७५ लाख ९० हजार १२ रुपये आहे. यात २० कोटी सेंट जॉर्ज रुग्णालयामध्ये कोविडसाठी विशेष आयसुआय सेटअपसाठी वैद्यकीय शिक्षण विभागामार्फत खर्च करण्यात आले. कोविडच्या २५ हजार चाचण्यासाठी ABBOT M2000RT PCR या मशीनच्या कंझुमेबल्स विकत घेण्यासाठी ३ कोटी ८२ लाख ५० हजार खर्च करण्यात आले. औरंगाबाद जिल्ह्यातील रेल्वे दुर्घटनेमध्ये मृत झालेल्या मजुरांच्या वारसांना ८० लाखांचे अर्थसहाय्य करण्यात आले.

 

हे ही वाचा:

‘तळीरामांची जशी काळजी घेता तशी मराठा समाजातील तरुणांचीही घ्या’

अभिनेत्री माधवी गोगटे यांचे कोरोनामुळे निधन

शिवचरित्र हा श्वास, राष्ट्रनिर्मितीचा ध्यास

आझाद मैदानात सरकारचे तेरावे

 

स्थलांतरित मजुरांचे श्रमिक रेल्वे शुल्कासाठी ८२ कोटी ४६ लाख ९४ हजार २३१ रुपये खर्च करण्यात आले. रत्नागिरी आणि जालना जिल्ह्यात कोविड १९ च्या चाचण्या करण्यासाठी क्रमशः १ कोटी ७ लाख ६ हजार ९२० रुपये खर्च करण्यात आले.  प्लाझ्मा थेरेपीच्या चाचण्या करण्यासाठी १८ शासकीय वैद्यकीय महाविद्यालये, ४ पालिका वैद्यकीय महाविद्यालय, १ टीएमसी वैद्यकीय महाविद्यालय यांस १६.८५ कोटी रुपये देण्यात आले. माझे कुटुंब आणि माझी जबाबदारी या अभियानासाठी १५ कोटी आयुक्त, राज्य स्वास्थ्य संस्था यांस देण्यात आले. कोविड दरम्यान देह विक्री करणा-या महिलांना ४९ कोटी ७६ लाख १५ हजार ९४१ रुपयांचे अर्थसहाय्य करण्यात आले. कोविड आजाराअंतर्गत म्युटंट मधील व्हेरिएन्टचे संशोधनाकरिता जिनोम सिक्वेसिंगकरीता १ कोटी ९१ लाख १६ हजार खर्च करण्यात आले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
148,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा