32 C
Mumbai
Monday, June 21, 2021
घर विशेष बापरे ! म्युकरमायकोसिसच्या रुग्णाला खर्च आला दीड कोटी

बापरे ! म्युकरमायकोसिसच्या रुग्णाला खर्च आला दीड कोटी

Related

कोरोना अजूनही आपल्यात असताना म्यूकरमायकोसिसचेही थैमान जोडीला सुरू झाले. महाराष्ट्रामध्ये काळ्या बुरशीचा पहिला रुग्ण आढळला तो म्हणजे विदर्भामध्ये. विदर्भातील पहिला रुग्ण म्हणजेच नवीन पॉल. वय वर्षे ४६ असलेल्या पॉल यांना काळ्या बुरशीची लागण झाली. त्यांना यावरील उपचारासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च करावे लागले आहेत. पॉल हे बहुधा मध्य भारतातील या काळ्या बुरशीचे पहिले रुग्ण असावेत असाही डॉक्टरांचा अंदाज आहे. या सगळ्या उपचारासाठी त्यांना प्रचंड मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला आहे. त्यांना एक डोळाही यात गमवावा लागला.

पॉल हे राज्य शासकीय कर्मचारी. कोरोना झाल्यानंतर त्यांना दातांचा आणि डोळ्यांचा त्रास होण्यास सुरुवात झाली. त्यावेळी काळी बुरशी हा रोगच डॉक्टरांकरता नवीन होता. पॉल यांना ऑक्टोबरमध्ये ही लक्षणे आढळली. त्यानंतर फेब्रुवारीमध्ये त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आणि डोळा काढून टाकण्यात आला. पॉल यांनी आजतागायत या उपचारासाठी तब्बल दीड कोटी रुपये खर्च केले आहेत. त्यांचा डावा डोळा काढून टाकण्यापूर्वी त्या डोळ्यावर सहा रुग्णालयांमध्ये उपचार सुरु होते. इतकेच नाही तर डोळ्यावर जवळपास १३ शस्त्रक्रियाही करण्यात आल्या.

हे ही वाचा:

कॉंग्रेसच्या आर्थिक उत्पनाचा आलेखही अधोगतीकडे

नव्या कोरोना रुग्णांची संख्या लाखापेक्षा कमी

मोदींच्या घोषणेने ग्लोबल टेंडरची हवाच काढली

समन्वय प्रतिष्ठानमार्फत ३००० ठाणेकरांचे लसीकरण

पॉल यांची पत्नी रेल्वेमध्ये कर्मचारी असल्यामुळे त्यांना रेल्वेकडून एक कोटी रुपये मिळाले. परंतु बाकीच्या जवळपास ५० लाखांचा बंदोबस्त त्यांना स्वतः करावा लागला. टाइम्स या वृत्तपत्राशी बोलताना पॉल म्हणाले की, मी मनाची तयारी केली होती की माझा डोळा वाचणार नाही. परंतु डॉक्टरांना मी सांगितले होते की माझा जीव वाचला पाहिजे.

सप्टेंबरमध्ये त्यांना कोरोनाची लागण झाली होती. रुग्णालयातून घरी आल्यानंतर त्यांना काळ्या बुरशीचा संसर्ग सुरु झाला. सर्वात आधी त्यांना शहरातील न्यूरोलॉजी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथून मग सुरु झाला सिलसिला रुग्णालये बदलण्याचा. आजारावर निदान काय ते होईना म्हणूनच मग त्यांना हैदराबादच्या नेत्र रुग्णालयात नेण्यात आले. तिथून काही काळानंतर ते परत नागपुरातील दुसर्‍या रुग्णालयात गेले. तिथून अखेर मुंबईतील एका कॉर्पोरेट रुग्णालयात दाखल झाले. मुंबईतील रूग्णालयाकडून त्यांच्याकडून १९ लाख रुपये घेण्यात आले. त्यामुळे त्यांनी तिथून काढता पाय घेतला. ते परत नागपुरात आले आणि एका खासगी रुग्णालयात त्याचा डोळा काढून टाकण्यात आला.

पॉल यावर अधिक बोलताना म्हणतात की, जीव वाचला हाच काय तो आनंद आहे. त्यावेळी म्यूकोमायकोसिस हा रोग चर्चेत आला नव्हता आणि डॉक्टरांनाही फारसा अनुभव नव्हता. सुरुवातीच्या काळात कोणालाही हा बुरशीचा आजार असू शकेल असे वाटलेही नव्हते असे डॉ. आशिष कांबळे यांनी म्हटले. डॉक्टर विपिन देहाणे यांनी अनेक शस्त्रक्रिया करून पॉल यांना यातून वाचवले.

एकूणच हा सर्व प्रकार पाहता असे वाटते भीक नको पण कुत्रा आवर. आपल्याकडे असणारे वैद्यकीय अनास्था आणि रुग्णालयांचे खर्च पाहता असे वाटते की, यापेक्षा मरण पत्करले. पॉल यांच्याकडे ५० लाखांची सोय करण्याची दानत होती, सर्वसामान्य कुठून आणणार इतका पैसा हाच एक प्रश्न आज अनुत्तरीत आहे, कदाचित तो अनुत्तरितच राहिल.

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

2,721चाहतेआवड दर्शवा
526अनुयायीअनुकरण करा
1,110सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा