25 C
Mumbai
Monday, November 10, 2025
घरविशेषमुंबईकरांचा प्रवास होणार एकदम 'बेस्ट'

मुंबईकरांचा प्रवास होणार एकदम ‘बेस्ट’

मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते बेस्टच्या पर्यावरणस्नेही १५७ वातानुकूलित इलेक्ट्रीक बसगाड्यांचे लोकार्पण संपन्न

Google News Follow

Related

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, या बसगाड्यांमुळे मुंबईकरांची सोय होणार आहे तसेच पर्यावरणावर एमिशनचा होणारा परिणामही कमी होणार आहे. तसेच मुंबईकरांचा प्रवास अधिक सुकर व्हावा आणि संपूर्ण पब्लिक ट्रान्सपोर्टचा प्रवास प्रदूषणमुक्त व्हावा, यासाठी ५००० इलेक्ट्रीक बसगाड्यांच्या वितरणाचा निर्णय घेण्यात आला. टप्प्याटप्प्याने या बसगाड्या लोकसेवेसाठी रुजू होतील, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी संगितले.

बेस्टची वाहतूक सेवा मुंबईची जीवन वाहिनी आहे. मुंबई मेट्रो, उपनगरीय लोकल ट्रेन यांसारख्या सेवांवर जास्त ताण येऊ नये, यासाठी बससेवा अधिक बळकट करू, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

जगात प्रत्येक महानगरमध्ये बससेवा महत्त्वाची भूमिका बजावते आणि त्यामुळे बेस्टच्या विकासासाठी आणि बळकटीसाठी बीएमसीने निधी उपलब्ध करून दिला. तसेच बससेवेमध्ये काम करणार्‍या कर्मचार्‍यांचा विचार करून त्यांची उर्वरित देणी आणि बोनस यासंदर्भात आयुक्तांशी संवाद साधून निधी उपलब्ध करून दिला, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी संगितले.

हे ही वाचा : 

महाराष्ट्र बनणार ‘रिइमॅजिनिंग मॅन्युफॅक्चरिंग’चा नवा चेहरा!

सागरी मंथनामुळे लाभणार विकास ‘अमृत’

सागरी क्षेत्रात गुंतवणुकीसाठी दोन अब्ज डॉलर्सचे करार

छवी मित्तल यांनी शेअर केला ‘त्या’ दिवसांचा भीषण अनुभव

आपण सुरू केलेल्या सिंगल तिकिटिंगच्या माध्यमातून विकासासाठी अधिक निधी उपलब्ध होऊ शकतो. त्याचप्रमाणे ४० % हून आधिक ‘नॉन फेयरबॉक्स’ रेवेन्यूसाठी मुंबईसारख्या शहरामध्ये खूप मोठी संधी आहे त्याचा उपयोग झाला पाहिजे, जेणेकरून आपली बेस्ट आपल्या पायावर उभी राहून अधिक बळकट होईल, त्यासंदर्भात राज्य सरकार आणि बीएमसीकडून लागणारी सर्वतोपरी मदत करू, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, मंत्री ॲड. आशिष शेलार व इतर मान्यवर उपस्थित होते.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
280,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा