27.7 C
Mumbai
Thursday, July 17, 2025
घरविशेषयूपी संस्कृत बोर्डाच्या परीक्षेत १४,००० मुलांना मागे टाकत मुस्लिम विद्यार्थी अव्वल ...

यूपी संस्कृत बोर्डाच्या परीक्षेत १४,००० मुलांना मागे टाकत मुस्लिम विद्यार्थी अव्वल !

३०० रुपये रोजंदारी करणाऱ्या शेतमजूराच्या मुलाने परीक्षेत ८२.७% गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे.

Google News Follow

Related

यूपीच्या चंदौली येथील शेतमजुराचा मुलगा मोहम्मद इरफानने उत्तर प्रदेश माध्यमिक संस्कृत शिक्षा परिषद बोर्डाच्या उत्तर मध्यमा-२ (वर्ग १२) परीक्षेत ८२.७% गुण मिळवून अव्वल स्थान पटकावले आहे आणि जवळपास १४,०००  विद्यार्थ्यांना मागे टाकून सर्वाधिक गुण मिळवणारा ठरला आहे. मंडळाकडे संस्कृत भाषा आणि साहित्य हे दोन अनिवार्य विषयांसह इतर विषय आहेत. संस्कृत शिक्षक होण्याचे स्वप्न पाहणारा इरफान (१७) इयत्ता १०वी आणि १२वीच्या परीक्षेत सर्वाधिक २० गुण मिळवणाऱ्यांमध्ये एकमेव मुस्लिम आहे.

मुलाचे वडील सलाउद्दीन म्हणतात, इरफानला संपूर्णानंद संस्कृत सरकारी शाळेत प्रवेश मिळवून दिला कारण ती एकमेव शाळा होती ज्याची फी तो घेऊ शकत होता. “मी ३०० रुपये रोजंदारी करणारा शेतमजूर आहे आणि दर महिन्याला काही दिवस काम करतो. इरफानला खाजगी किंवा इतर कोणत्याही शाळेत पाठवणे मला परवडणारे नव्हते.सलाउद्दीन म्हणाला की, इरफान नेहमीच अभ्यासात चांगला होता आणि शाळेच्या पहिल्या दिवसापासूनच त्याने संस्कृतमध्ये रस घेण्यास सुरुवात केली.

हे ही वाचा:

‘द केरळ स्टोरी’ पहिल्याच दिवशी सुपरहिट!

सुरक्षा दलाला यश, बारामुल्लामध्ये दहशतवाद्याचा खात्मा

इतिहासात पहिल्यांदाच ब्रिटनच्या राज्याभिषेक सोहळ्याला हिंदू धर्मगुरूंची उपस्थिती

‘दहशतवादी उद्योगाचे प्रवक्ते’, जयशंकर यांनी बिलावलना सुनावले

“तो त्याच्या अभ्यासात इतका समर्पित होता की आमचे छोटे घर किंवा अगदी कमी सुविधा असूनही त्याने कधीही कोणत्याही गोष्टीबद्दल तक्रार केली नाही.आमच्याकडे सिमेंटचे घरही नाही,” ते म्हणाले. एका महिन्यापूर्वी या कुटुंबाला सरकारी योजनेअंतर्गत पक्के घर बांधण्यासाठी पैसे मिळाले.अशी बिकट परिस्तिथी असूनही त्याने कधी परिस्तिथीला समोर न आणता आपल्या शिक्षणाकडे लक्ष केंद्रित करून त्याने अव्वल स्थान मिळवले याचा मला अभिमान आहे. मला कळत नाही लोक भाषेला धर्माशी का जोडतात, असेही ते म्हणाले.“

एक हिंदू उर्दू शिकण्यात खूप चांगला असू शकतो आणि मुस्लिम संस्कृतमध्ये उत्कृष्ट होऊ शकतो,” ते पुढे म्हणाले. “कनिष्ठ वर्गात संस्कृत हा अनिवार्य विषय होता आणि इरफानला या भाषेची आवड निर्माण झाली.सलाउद्दीन म्हणाला की, कुटुंब इरफानला त्याच्या स्वप्नाचा पाठपुरावा करण्यापासून रोखणार नाही.तो आता शास्त्री (बीए समतुल्य) आणि आचार्य (एमए समतुल्य) करण्याची योजना आखत आहे आणि नंतर संस्कृत शिक्षक म्हणून नोकरी शोधेल, असे सलाउद्दीन म्हणाले.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
256,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा