27 C
Mumbai
Wednesday, September 28, 2022
घरविशेषनितेश राणे यांच्या गाडीला अपघात पण कुणालाही इजा नाही

नितेश राणे यांच्या गाडीला अपघात पण कुणालाही इजा नाही

Related

महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अपघातात उद्योगपतींपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत अनेकांना जीव गमवावा लागला आहे. काही दिवसांपूर्वीच शिवसंग्राम पक्षाचे नेते वियानाक मेटे यांचा अपघाती मृत्यू झाला होता. परवाच उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा अपघात ताजा असतानाच भाजपा आमदार नितेश राणे यांच्या गाडीचा अपघात झाला आहे. पुणे-मुंबई द्रुतगती महामार्गावरील उर्से टोलनाक्यानजीक हा अपघात घडला असून सुदैवाने यात कोणीही जखमी नाही.

नितेश राणे यांचे कुटुंबीय पुणे मुंबई द्रुतगती महामार्गावरून प्रवास करत होते. त्यावेळी या प्रवासात नितेश राणे यांच्या पत्नी, मुलं आणि नातेवाईक या गाडीतून प्रवास करत होते. उर्से टोलनाक्यावर त्यांची गाडी आली तेव्हा टोलभरण्यासाठी टोलनाक्यावर रांगेत गाडी थांबली होती. यादरम्यान, पाठीमागून आलेल्या ट्रकने राणे कुटुंबियांच्या कारला मागून धडक दिली. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झालेली नाही.

हे ही वाचा:

पाकिस्तानकडून भारतीय जवानांवर हल्ला

बेंगळुरूतील आयटी कर्मचाऱ्यांच्या कार गेल्या वाहून, ट्रॅक्टर आला धावून

ब्रिटनकडून ‘लगान’ वसूल करण्याची वेळ

‘या’ दिवशी ७५ रुपयांत बघा कुठलाही सिनेमा

राणे कुटुंबियांच्या गाडीला धडक लागल्याने त्यांच्या मागच्या बाजूचा इंडिकेटर फुटला आहे. या प्रकरणी पिंपरी चिंचवड पोलिसांनी ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून, या अपघाताचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,967चाहतेआवड दर्शवा
1,941अनुयायीअनुकरण करा
40,500सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा