32 C
Mumbai
Sunday, June 4, 2023
घरविशेषबसमध्ये इयरफोनशिवाय व्हीडिओ, ऑडिओ ऐकलात तर कान पकडणार!

बसमध्ये इयरफोनशिवाय व्हीडिओ, ऑडिओ ऐकलात तर कान पकडणार!

बेस्ट प्रशासनाने काढले आदेश, कारवाईचा इशारा

Google News Follow

Related

बेस्टच्या बसेसमधून प्रवास करताना अनेक लोक मोबाईलवर गाणी ऐकत असतात किंवा मोठ्या आवाजात एखादा व्हीडिओ लावून त्याचा आनंद घेत असतात. काही लोक मोठमोठ्याने फोनवर समोरच्याशी बोलत असतात. यावर बेस्टने आता काही निर्बंध घातले आहेत.

बेस्टचे उप मुख्य व्यवस्थापक वाहतूक नियोजन व प्रशासन विभागाचे रमेश मडावी यांनी यासंदर्भात काही आदेश काढले आहेत. २४ एप्रिलला हे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. सर्व बसगाड्यांत हे आदेश प्रदर्शित करण्याच्याही सूचना त्यांनी दिल्या आहेत. त्यानुसार इयरफोनशिवाय मोबाईलवर ऑडिओ, व्हीडिओ ऐकणे, बघणे तसेच मोठ्या आवाजात बोलण्यास सक्त मनाई आहे, अशा सूचना लिहिल्या जाव्यात असे आदेशात म्हटले आहे.

हे ही वाचा:

सागरपुत्र अभिलाष टॉमीचे स्वप्न फक्त ७०० किलोमीटरवर!

२०१९ला जोडे पुसायला कोण गेले होते?

राज म्हणतात, जपून रहा उद्धव म्हणतात बदला घेणार

आंतरजातीय विवाहाच्या विरोधातून पित्याने मुलीसह पत्नीवर काढला राग

या पत्रात विषय लिहिण्यात आला आहे की, उपक्रमाच्या बसगाड्यांमध्ये मोबाईल वापरावर मर्यादा. त्याअंतर्गत लिहिण्यात आले आहे की, सद्यस्थितीत उपक्रमाच्या बसगाड्यांमधून प्रवास करणाऱ्या बहुतांश प्रवाशांकडे मोबाईल फोन असतात. त्याचा वापर मुक्तपणे करण्यात येत असतो. अनेक प्रवाशी या मोबाईल फोनवर जोरजोराने बोलत असतात तसेच काही प्रवासी मोबाईलवर ऑडिओ, व्हीडिओ ऐकत असतात, बघत असतात. आवाजाची पातळी उच्चतम असल्यामुळे बसगाडीमधील अन्य प्रवाशांना नाहक त्रास होतो. ही परिवहन सेवा सार्वजनिक असून बसमधून प्रवास करणाऱ्या अन्य प्रवाशांना त्रास होऊ नये म्हणून मुंबई पोलिस कायद्यांतर्गत कलम ३८/११२ सदर प्रवाशावर कारवाई होऊ शकते. ही बाब विचारात घेऊन बसगाडीत इयरफोनशिवाय मोबाईल ऑडिओ, व्हीडिओ ऐकण्यास बघण्यास तसेच मोठ्या आवाजात फोनवर बोलण्यास मनाई करण्यात आलेली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा