30 C
Mumbai
Wednesday, July 17, 2024
घरविशेषअभिमानाचा क्षण! छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारशासाठी नामांकित

अभिमानाचा क्षण! छत्रपती शिवाजी महाराजांचे १२ किल्ले जागतिक वारशासाठी नामांकित

युनेस्कोकडे भारताकडून प्रस्ताव सादर

Google News Follow

Related

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीसाठी केंद्र सरकारकडून छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना नामांकन मिळाले आहे. मराठा शासन काळातील लष्करीदृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या १२ किल्ल्यांना नामांकन देण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंबंधी माहिती दिली आहे.

महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील मराठा लष्करी रणभूमीचा परिसर अर्थात गडकिल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट करण्यासाठीचा प्रस्ताव भारत सरकारने युनेस्कोला सादर केला आहे. २०२४- २५ या वर्षासाठी हा प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. यात किल्ले रायगड, शिवनेरी, तोरणा, लोहगड, साल्हेर, खंडेरी, राजगड, प्रतापगड, सुवर्णदुर्ग, पन्हाळा, विजयदुर्ग, सिंधुदुर्ग या १२ किल्ल्यांचा समावेश आहे. हा प्रस्ताव सादर केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाचे देवेंद्र फडणवीस यांनी आभार मानले आहेत.

प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने दिलेल्या माहितीनुसार, १७ व्या आणि १९ व्या शतकात मराठा शासन काळात या किल्ल्यांचा वापर करून राज्यकर्त्यांनी पराक्रम गाजविला. सह्याद्री, कोकण किनारपट्टी आणि दख्खनच्या पठारावर असलेल्या या किल्ल्यांचे भौगोलिक, सांस्कृतिक असे महत्त्व आहे. महाराष्ट्रात एकूण ३९० छोटे-मोठे किल्ले आहेत. त्यापैकी युनेस्कोच्या यादीत समाविष्ट करण्यासाठी १२ किल्ल्यांची निवड करण्यात आली आहे. भारतीय पुरातत्त्व विभागाकडून १२ पैकी आठ किल्ल्यांचे याआधीच संवर्धन करण्यात आलेले आहे.

हे ही वाचा:

राबडीदेवीच्या गोशाळेतील कामगाराला लाच म्हणून मिळाली मालमत्ता

‘अधीर रंजन म्हणजे काँग्रेसमधील छुपे शत्रू’

हेमंत सोरेन यांची पत्नी झारखंडच्या मुख्यमंत्री होतील!

आयएनएस सुमित्राने चाचेगिरीचा प्रयत्न हाणून पाडला; १९ पाकिस्तानी नागरिकांसह इराणी जहाजाला वाचविण्यात यश

युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाचे नामांकन सांस्कृतिक आणि नैसर्गिक अशा दोन श्रेणीमध्ये होत असते. महाराष्ट्रातील किल्ल्यांचा समावेश सांस्कृतिक श्रेणीत करण्यात आला आहे. भारतातील ४२ ठिकाणांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळाच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
164,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा