भारतीय रेल्वेने प्रवाशांच्या सुविधेसाठी मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेसमध्ये देशातील पहिलं ट्रेन एटीएम बसवलं आहे. यामुळे प्रवासी धावत असलेल्या ट्रेनमध्येही सहजपणे रोख रक्कम काढू शकतील. हे एटीएम ट्रेनच्या एसी कोचमध्ये बसवण्यात आलं असून, त्याचं प्रायोगिक परीक्षण यशस्वी झालं आहे. या मशीनद्वारे प्रवाशांना ट्रेन चालू असतानाही पैसे काढण्याची सुविधा मिळेल. भारतीय रेल्वेच्या इनोव्हेटिव्ह आणि नॉन-फेअर रेव्हेन्यू आयडिया (INFRES) च्या अंतर्गत ही योजना राबवण्यात आली आहे.
ही संयुक्त उपक्रम योजना भुसावळ रेल्वे विभाग आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यातील सहकार्याने सुरू करण्यात आली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं की, प्रयोग यशस्वी ठरला आणि ट्रेनच्या संपूर्ण प्रवासात एटीएम यंत्र व्यवस्थित कार्यरत होतं. मात्र, इगतपुरी आणि कसारा दरम्यानच्या भागात थोडा वेळ नेटवर्कचा अडथळा जाणवला, कारण हा भाग बोगद्यांमुळे आणि मर्यादित मोबाईल नेटवर्कमुळे ओळखला जातो.
हेही वाचा..
राहुल गांधी, तेजस्वी यादव राजकारणात अपरिपक्व
अमेरिकेतील टेक्सासमध्ये गोवरचा उद्रेक
बंगालमधील मुर्शिदाबाद पु्न्हा पेटले !
भुसावळचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इती पांडे म्हणाले, “परिणाम खूपच चांगले आले. आता प्रवासी प्रवासादरम्यान रोख रक्कम काढू शकतील. आम्ही या यंत्राच्या कामगिरीवर सातत्यानं लक्ष ठेवणार आहोत.” पांडे यांनी सांगितले की, ही कल्पना प्रथम भुसावळ विभागात आयोजित INFRES बैठकीत मांडण्यात आली होती. जरी एटीएम एसी कोचमध्ये ठेवण्यात आलं असलं तरी, पंचवटी एक्स्प्रेसमधील सर्व २२ डब्यांचे प्रवासी हे वापरू शकतात, कारण सर्व डबे वेस्टिब्युलमार्फत एकमेकांशी जोडलेले आहेत.
फक्त रोख रक्कम काढणेच नाही, तर प्रवासी या एटीएमचा वापर चेक बुक मागवण्यासाठी आणि खात्याचे तपशील मिळवण्यासाठी देखील करू शकतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, हेच एटीएम मुंबई-हिंगोली जनशताब्दी एक्स्प्रेसमध्येही प्रवाशांसाठी उपलब्ध असेल, कारण दोन्ही गाड्या एकाच रेकचा वापर करतात. याचा अर्थ असा की लांब पल्ल्याच्या प्रवाशांनाही या सुविधेचा लाभ मिळणार आहे.
सुरक्षेसाठी, एटीएममध्ये शटर सिस्टीम लावण्यात आली असून, २४ तास सीसीटीव्ही निगराणी ठेवण्यात आली आहे. रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले की, ही सेवा जर लोकप्रिय झाली, तर ती इतर ट्रेनमध्येही विस्तारित करण्यात येईल.