नॅशनल हेराल्ड प्रकरणात आरोपपत्र दाखल झाल्यानंतर काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी दिल्लीत आणि मुंबईत आंदोलन केले. मुंबईत आंदोलन करणाऱ्या खासदार वर्षा गायकवाड यांना ताब्यात घेण्यात आले. यावेळी गायकवाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट झाल्याचे पाहायला मिळाले. दरम्यान, या आंदोलनावरून भाजपा नेते विनोद तावडे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे.
विनोद तावडे ट्वीटकरत म्हणाले, गांधी परिवार कायद्यापेक्षा मोठा नाही. नॅशनल हेराल्ड घोटाळ्याची चौकशी कायद्यानुसारच होत आहे. काँग्रेसने अशी पोरकट आंदोलने करून स्वतःची फसवणूक करून घेवू नये.
ते पुढे म्हणाले, १ नोव्हेंबर २०१२ ला या प्रकरणाची सुरुवात झाली आहे, हे सर्व देश जाणतो. तेव्हा काँग्रेसप्रणित युपीएचीच सत्ता केंद्रात होती. त्यामुळे तपासाचा द्वेष भाजपच्या माथी मारून जनतेच्या डोळ्यात धूळफेक नको, असे विनोद तावडे यांनी म्हटले.
दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू कोर्टात ईडीने काल (१५ एप्रिल) आरोपपत्र दाखल केले होते. या आरोपपत्रात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि काँग्रेसचे प्रमुख सॅम पित्रोदासह इतरांची नावे आहेत. ईडीकडून आरोपपत्र दाखल होताच काँग्रेसने संताप व्यक्त करत आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आज आंदोलन करण्यात आले.
हे ही वाचा :
राहुल गांधी, तेजस्वी यादव राजकारणात अपरिपक्व
अमेरिका- चीन व्यापार युद्ध अधिक तीव्र: ट्रम्प प्रशासनाकडून चीनी वस्तूंवर २४५% कर
बंगालमधील मुर्शिदाबाद पु्न्हा पेटले !
दरम्यान, पक्षाचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यांनी याला “सुडाचे राजकारण” म्हटले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा विरोधी नेत्यांना “धमकवण्यासाठी” सरकारी संस्थांचा वापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, न्यायालय २५ एप्रिल रोजी या प्रकरणाची सुनावणी करणार आहे.
गाँधी परिवार कानून से ऊपर नहीं है। नेशनल हेराल्ड घोटाले में उनसे पूछताछ कानून के हिसाब से हो रही है, ऐसे में कांग्रेस को इन बचकाने विरोध-प्रदर्शनों में शामिल होकर खुद को धोखा नहीं देना चाहिए।
पूरा देश जानता है कि ये मामला 1 नवंबर 2012 को शुरू हुआ था, जब कांग्रेस के नेतृत्व वाली…
— Vinod Tawde (@TawdeVinod) April 16, 2025