अमेरिका आणि चीन या दोन्ही देशांमधील व्यापार युद्ध अधिकाधिक तीव्र होत असतानाचं आता व्हाईट हाऊसने मंगळवारी दुपारी (भारतीय वेळेनुसार) सांगितले की, चीनने केलेल्या प्रत्युत्तरात्मक कारवाईमुळे आता अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर २४५ टक्के कर लावावा लागेल. व्हाईट हाऊसने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, चीनच्या प्रत्युत्तरात्मक कृतींमुळे अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवर २४५ टक्क्यांपर्यंत कर लावण्यात आला आहे. नवीनतम सुधारणा करण्यापूर्वी, अमेरिकेत होणाऱ्या चिनी निर्यातीवर १४५ टक्के कर आकारला जात होता.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या देशांशी व्यापार तूट आहे अशा अनेक देशांवर परस्पर कर लादले होते. नंतर, अनेक देशांनी व्यापार करारासाठी अमेरिकन प्रशासनाशी चर्चा सुरू केल्यानंतर, अध्यक्ष ट्रम्प यांनी ९० दिवसांसाठी कर थांबवण्याचा निर्णय घेतला. यात भारताचाही समावेश आहे. व्हाईट हाऊसच्या पत्रकात म्हटले आहे की, “७५ हून अधिक देशांनी आधीच नवीन व्यापार करारांवर चर्चा करण्यासाठी संपर्क साधला आहे.”
ट्रम्प यांच्या परस्पर शुल्कामुळे जागतिक स्तरावर वित्तीय बाजारपेठांमध्ये व्यापक घसरण झाली आहे. आशिया आणि युरोपमधील बाजारपेठा कोसळल्या आहेत. परस्पर शुल्कामुळे जागतिक स्तरावर शेअर बाजारात विक्री झाली आहे आणि अमेरिकाही त्याला अपवाद नाही. गुंतवणूकदारांना भीती आहे की जागतिक व्यापारासंदर्भातील हालचाली महागाई वाढवू शकतात आणि आर्थिक वाढीला धोका निर्माण करू शकतात. दुसऱ्या कार्यकाळात पदभार स्वीकारल्यापासून, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी कर परस्पर शुल्काबाबतच्या आपल्या भूमिकेचा पुनरुच्चार केला आहे आणि निष्पक्ष व्यापार सुनिश्चित करण्यासाठी अमेरिका भारतासह इतर देशांनी लादलेल्या शुल्कांशी जुळवून घेईल यावर भर दिला आहे.
हे ही वाचा..
अमेरिकेतील टेक्सासमध्ये गोवरचा उद्रेक
बंगालमधील मुर्शिदाबाद पु्न्हा पेटले !
पश्चिम बंगालमध्ये घटनात्मक यंत्रणा अपयशी
ममता बॅनर्जी यांची इमामांशी भेट, काय घडले भेटीत ?
गेल्या शुक्रवारी चीनने अमेरिकेच्या वस्तूंवरील कर १२५ टक्के पर्यंत वाढवले. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी चिनी आयातीवरील कर १४५% पर्यंत वाढवल्यानंतर आणि इतर देशांच्या वस्तूंवरील अतिरिक्त कर ९० दिवसांसाठी थांबवल्यानंतर लगेचच हे पाऊल उचलण्यात आले.