28 C
Mumbai
Thursday, March 28, 2024
घरविशेषराज्याच्या कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट

राज्याच्या कोरोना रुग्ण संख्येत मोठी घट

Google News Follow

Related

महाराष्ट्रात कोविडच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. आता राज्यातील आकडे उतरणीकडे लागलेले दिसत आहेत. आजही राज्यातील रुग्णसंख्येत मोठी घट पहायला मिळाली आहे.

राज्यात आज २६,६१६ नवे रुग्ण आढळले असून, ५१६ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृत्यूदर हा १.५३ टक्के एवढा झालाय. आजच्या रुग्णवाढीनंतर राज्यात एकूण ४,४५,४९५ सक्रिय रुग्ण आहेत. राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ५४,०५,०६८ वर पोहोचली आहे.

हे ही वाचा:

पालिकेच्या ग्लोबल टेंडरला शून्य प्रतिसाद

कोविन आता प्रांतिक भाषांमध्येही उपलब्ध होणार

धक्कादायक! भाजपासारखा व्यापक विचार करा, खुर्शीद यांचा काँग्रेसला सल्ला

व्हेंटिलेटर्सवरून राजकारण कशाला करता; फडणवीसांचा सवाल

राज्यात आज ४८,२११ रुग्ण बरे

राज्यात आज ४८,२११ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे राज्यात एकूण ४८,७४,५८२ कोरोनाबाधित रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९०.१९% एवढे झाले आहे. सध्या राज्यात ३३,७४,२५८ व्यक्ती गृह विलगीकरणात आहेत, तर २८,१०२ व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतही वाढ

गेल्या काही दिवसांपासून मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तसेच बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढलेय. त्याशिवाय मुंबईतील रुग्ण दुप्पट होण्याच्या कालावधीतही वाढ झाली. त्यामुळे मुंबईकरांना दिलासा मिळाला आहे.

मुंबईत दिवसभरात १ हजार २४० रुग्णांची नोंद

मुंबईत दैनंदिन रुग्णसंख्येत कमालीची घट होत आहे. मुंबईचा रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २४६ दिवसांवर गेला आहे. त्यामुळे मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव हा कमी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मुंबई शहरासह उपनगरात दिवसभरात २ हजार ५८७ रुग्ण बरे झालेत. मुंबईत आतापर्यंत एकूण ६ लाख ३९ हजार ३४० रुग्णांनी कोरोनावर मात केलीय. त्यामुळे सध्या मुंबईत ३४ हजार २८८ रुग्ण सक्रिय आहे. मुंबईत दिवसभरात १ हजार २४० रुग्णांची नोंद झाली.

मात्र सातत्याने भाजपाकडून हा आकडा ठाकरे सरकारने आपले अपयश झाकण्यासाठी कमी केलेल्या चाचण्यांमुळे असल्याची टीका केली आहे. आजचे आकडे देखील त्याच मालिकेतील पुढचा भाग असल्याचे दिसत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा