30 C
Mumbai
Friday, May 16, 2025
घरविशेषऑपरेशन सिंदूर: भारताने लक्ष्य केलेली दहशतवाद्यांची नऊ ठिकाणं कोणती?

ऑपरेशन सिंदूर: भारताने लक्ष्य केलेली दहशतवाद्यांची नऊ ठिकाणं कोणती?

पत्रकार परिषदेत महिला अधिकाऱ्यांनी दिली माहिती

Google News Follow

Related

पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी म्हणून भारताने ७ मे रोजी मध्यरात्री पीओके आणि पाकिस्तानमधील दहशतवादी कॅम्प्सवर एअर स्ट्राइक केला. ऑपरेशन सिंदूर असे या मोहिमेला नाव देण्यात आले होते. या मोहिमेची सविस्तर माहिती विदेश मंत्रालय आणि लष्कराकडून देण्यात आली. विशेष म्हणजे कर्नल सोफिया कुरेशी आणि हवाई दलाकडून स्क्वॉड्रन लीडर व्योमिका सिंग या महिला अधिकाऱ्यांनी या संपूर्ण ऑपरेशनची माहिती दिली.

पाकिस्तानात ज्या नऊ ठिकाणी एअर स्ट्राइक करण्यात आला. त्यासाठी टार्गेटची खूप विचारपूर्वक निवड करण्यात आली होती. या संदर्भातील काही व्हिडीओही दाखवण्यात आले. ६ ते ७ मे च्या मध्यरात्री १.०५ ते १.३० या वेळात ही ही कारवाई करण्यात आली. पाकिस्तान आणि पीओकेमध्ये असलेले दहशतवादी तळ गुप्तचर माहितीच्या आधारे लक्ष्य करण्यात आले असून यात नागरी इमारती अथवा लष्कराला अजिबात लक्ष्य करण्यात आले नसल्याचे या दोन महिला अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. सीमारेषेपासून हल्ल्याचे ठिकाण किती लांब आहे याचीही माहिती यावेळी देण्यात आली. तसेच या टार्गेट्सची निवड का करण्यात आली याचीही सविस्तर माहिती देण्यात आली.

पीओकेमधील टार्गेट

  • सवाईनाला कॅम्प मुझफ्फराबाद – पाकव्याप्त काश्मीरमध्ये सीमेपासून ३० किलोमीटर अंतरावर आहे. लष्कर-ए-तोयबाचा ट्रेनिंग तळ होता. पहलगाम, गुलमर्ग हल्ल्यातील दहशतवाद्यांनी इथेच प्रशिक्षण घेतलं होतं. पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांनी इथूनच प्रशिक्षण घेतलं होतं.
  • सय्यदना बिलाल कॅम्प – मुझफ्फराबाद जैश-ए-मोहम्मदचा तळ असून जंगल प्रशिक्षण केंद्र होतं. दहशतवादी हत्यारं आणि दारूगोळा ठेवत होते.
  • गुलपूर कॅम्प, कोटली – एलओसीपासून ३० किलोमीटर दूर. लष्कर-ए-तोयबाचा बेस कॅम्प. राजौरी आणि पूंछमध्ये या कॅम्पमधून प्रशिक्षण घेतलेल्या दहशतवाद्यांकडून कारवाया करण्यात आल्या होत्या.
  • बरनाला कॅम्प – एलओसीपासून ९ किलोमीटर दूर. दहशतवाद्यांना हत्यारांचे प्रशिक्षण, जंगल प्रशिक्षण देणारे केंद्र.
  • अब्बास कॅम्प, कोटली – एलओसीपासून १३ किलोमीटर दूर. लष्कर-ए-तोयबाचे फियादीन इथे तयार व्हायचे. १५ अतिरेकी राहण्याची सोय.

पाकिस्तानच्या हद्दीतील टार्गेट

  • सर्जल कॅम्प, सियालकोट – आंतरराष्ट्रीय सीमेपासून ६ किमी अंतरावर आहे. मार्च २०२५ मध्ये पोलिसांच्या चार जवानांची हत्या केली होती त्या दहशतवाद्यांना इथेचे प्रशिक्षण मिळाले होते.
  • महनूमा जाया कॅम्प, सियालकोट – आंतरराष्ट्रीय सीमेपासून १२ ते १८ किमी लांब होता. हा हिजबुल मुजाहिद्दीनचा कॅम्प होता. पठाणकोट एअर बेसवर झालेला हल्ला याच कॅम्पमध्ये आखण्यात आला होता.
  • मरकस ताएबा मुरीदके – आंतरराष्ट्रीय सीमेपासून १८ ते २५ किमी लांब आहे. २००८ च्या मुंबई हल्ल्याचे दहशतवादी अजमल कसाब आणि डेविड हेडलीलाही इथेच प्रशिक्षण दिलं गेलं होतं.
  • मरकझ सुभान अल्लाह, भागलपूर – हा तळ आंतरराष्ट्रीय सीमारेषेपासून १०० किमी लांब आहे. हे जैश ए मोहम्मदचं मुख्यालय होतं. इथे रिक्रुटमेंट, प्रशिक्षण दिलं जात होतं. दहशतवाद्यांचे महत्त्वाचे नेते इथे येत होते.

हे ही वाचा : 

‘आपल्या निष्पाप बांधवांच्या क्रूर हत्येला भारताचे प्रत्युत्तर’

भारताच्या ‘ऑपरेशन सिंदूर’वर राहुल गांधी, शरद पवार, संजय राऊत काय म्हणाले?

“भारताने कोटली, मुझफ्फराबाद, बहावलपूरमध्ये हल्ला केला!” पाकने केलं मान्य

“दहशतवाद्यांनी कुंकू पुसलेल्या महिलांचा पंतप्रधान मोदींनी ‘ऑपरेशन सिंदूर’मधून केला आदर!”

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,000चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
248,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा