बांगलादेशमध्ये हिंदूंना सतत लक्ष्य केले जात आहे. अलिकडच्या काळात, हिंदूंवरील अत्याचारांचे वृत्त देणारे अनेक माध्यमे आली आहेत. घरे जाळण्यात आली आहेत, हत्या करण्यात आल्या आहेत आणि हिंदूंना त्यांच्या नोकरीवरून राजीनामा देण्यास भाग पाडण्यात आले आहे. एवढ्या अत्याचारच्या घटना समोर येवू देखील प्रशासनाने कोणतेही कठोर पाऊल उचललेले दिसले नाही. अशातच आणखी एक हिंदू मुलीला लक्ष करून तिच्यावर अत्याचार केल्याचे समोर आले. यामध्ये एका स्थानिक राजकीय नेत्याचा सहभाग असून आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे.
आरोपींनी महिलेवर अत्याचार करून त्याचा व्हिडीओ बनवला. हिंदू मुलीवर झालेल्या सामूहिक बलात्कारानंतर बांगलादेशातील लोक संतप्त झाले आहेत आणि मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली आहेत. ढाका विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी या घटनेचा मोठ्या प्रमाणात निषेध केला आहे आणि गुन्हेगारांवर कठोर कारवाईची मागणी केली. ढाका विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सामूहिक बलात्काराचा निषेध करत कॅम्पसमध्ये मोर्चा काढला आणि न्यायाची मागणी केली.
ही घटना २६ जून रोजी घडली, जेव्हा २१ वर्षीय पीडितेवर कोमिल्ला येथील तिच्या घरी स्थानिक नेत्याने सामूहिक बलात्कार केला. सामूहिक बलात्कारादरम्यान मुलीचा व्हिडिओ देखील बनवण्यात आला होता. महिलेवर झालेल्या क्रूरतेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले.
आतापर्यंत पोलिसांनी या घटनेसंदर्भात पाच जणांना अटक केली आहे, ज्यात स्थानिक नेता आणि मुख्य आरोपी फजोर अली (३६) याचा समावेश आहे. कोमिल्ला जिल्हा पोलिस प्रमुख नजीर अहमद खान यांनी सांगितले की, मुख्य आरोपीला ढाक्यातील सईदाबाद भागात छाप्यात अटक करण्यात आली. महिलेचा फोटो शेअर केल्याबद्दल आणि सोशल मीडियावर तिची ओळख उघड केल्याबद्दल इतर चार जणांना अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण प्रकरणावर, माजी पंतप्रधान खालिदा झिया यांच्या बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी (BNP) चे सरचिटणीस मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
हे ही वाचा :
विक्रांत मॅसी फारशा चित्रपटांमध्ये का दिसत नाही?
लालू यादव यांनी केले वंशवादाचे राजकारण
मुंबईच्या खेळाडूंची किकबॉक्सिंग राज्य स्पर्धेत विजयी झेप!
ओबामा यांनी इराणला खूप काही दिलं, पण मी देणार नाही
दरम्यान, उच्च न्यायालयाने सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ तात्काळ काढून टाकण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले आहेत. दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने संबंधित अधिकाऱ्यांना पीडितेची सुरक्षा सुनिश्चित करण्यास आणि तिला आवश्यक उपचार देण्यास सांगितले आहे.
माजी पंतप्रधान शेख हसीना यांचे पुत्र सजीब अहमद वाजेद यांनी या घटनेबाबत सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट केली आणि म्हटले की, “गेल्या ११ महिन्यांत जमावाकडून होणारे हल्ले, दहशतवाद आणि बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ होण्यास युनुस प्रशासन जबाबदार आहे. गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हसीना यांच्या नेतृत्वाखालील अवामी लीग सरकार कोसळल्यानंतर बांगलादेशात अल्पसंख्याक समुदायांवरील हिंसाचार वाढला आहे.”
