पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मध्य प्रदेशच्या झाबुआमध्ये झालेल्या भीषण रस्ते अपघातावर शोक व्यक्त केला आहे. पंतप्रधानांनी अपघातात जखमी झालेल्या व्यक्तींना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच, अपघातात मृत्यू झालेल्या प्रत्येक व्यक्तीच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपयांची अनुग्रह रक्कम देण्याची घोषणा केली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पंतप्रधान मोदींच्या हवाल्याने एक पोस्ट केली, ज्यात लिहिले आहे, “मध्य प्रदेशच्या झाबुआमध्ये झालेल्या अपघातात लोकांचे मृत्यू झाल्याने मनापासून दुःख झाले आहे. जे लोक आपले प्रियजन गमावले आहेत, त्यांच्याबद्दल सहवेदना व्यक्त करतो. जखमींना लवकर बरे वाटावे, ही प्रार्थना करतो. PMNRF कडून प्रत्येक मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना २ लाख रुपये आणि जखमींना ५०,००० रुपये दिले जातील.”
हेही वाचा..
नरेंद्र मोदी, राजनाथसिंह यांनी घेतली ऑस्ट्रेलियाच्या उपपंतप्रधानांची भेट
अलाहाबाद उच्च न्यायालयाने राहुल गांधींचे कान उपटले; सैन्याची मानहानी करू नका!
“राष्ट्र सर्वोपरी”चे धडे काँग्रेसने पंतप्रधान मोदींना द्यावेत, हा या शतकातील सगळ्यात मोठा विनोद!
माइंडफुलनेस : आनंदी राहण्याचा सोपा आणि प्रभावी मार्ग, जाणून घ्या फायदे
त्याआधी, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री मोहन यादव यांनी देखील अपघातावर दुःख व्यक्त करत मृतांच्या कुटुंबीयांना २-२ लाख रुपये आणि जखमींना ५०-५० हजार रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली. मुख्यमंत्री यादव यांनी एक्सवर लिहिले, “झाबुआ जिल्ह्यातील सजेली रेल्वे फाटकाजवळ झालेल्या अपघातात एका एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू आणि २ जण जखमी झाल्याच्या बातमीने हृदय अत्यंत व्यथित झाले आहे. मृतांच्या कायदेशीर वारसांना २-२ लाख रुपये आणि जखमींना ५०-५० हजार रुपये आर्थिक मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो की, दिवंगत आत्म्यांना शांती लाभो व शोकाकुल कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्राप्त होवो.”
माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या झाबुआमध्ये मंगळवार आणि बुधवारच्या रात्रीच्या सुमारास एक ट्राला कारवर उलटला. या अपघातात कारमधील नऊ जणांचा मृत्यू झाला असून तीन जण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, झाबुआ जिल्ह्यातील थांदला आणि मेघनगर दरम्यानच्या सजेली रेल्वे फाटकाजवळ बांधकाम सुरू असलेल्या ओव्हर ब्रिजजवळ रात्री सुमारे दोन वाजता ट्रालाचा तोल गेला आणि ती कारवर उलटली. कारमधील सर्वजण एका लग्न समारंभातून परत येत होते.
