32 C
Mumbai
Sunday, June 4, 2023
घरविशेषवॉटर मेट्रो म्हणजे जेटी, बस टर्मिनल, मेट्रो नेटवर्क, तीर्थस्थळे यांना जोडणारा प्रकल्प!

वॉटर मेट्रो म्हणजे जेटी, बस टर्मिनल, मेट्रो नेटवर्क, तीर्थस्थळे यांना जोडणारा प्रकल्प!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमधील विविध प्रकल्पांचे केले उद्घाटन, पहिली वॉटर मेट्रो ठरणार आकर्षण

Google News Follow

Related

कोची वॉटर मेट्रोचा प्रकल्प मेड इन इंडिया आहे. त्यासाठी ज्यांनी बोट्स बनवल्या आहेत त्या कोची शिपयार्डचे अभिनंदन. वॉटर मेट्रोमुळे अनेक द्विपात राहणाऱ्यांना स्वस्त आणि आधुनिक वाहतूक पर्याय मिळेल. जेटी, बस टर्मिनल, मेट्रो रेल्वे नेटवर्क यादरम्यान इंटर मॉडेल कनेक्टीव्हिट पण प्रदान करेल. कोचीच्या रहदारीला आवर घातला जाईल. बॅक वॉटर पर्यटनाला आकर्षण मिळेल. मला विश्वास आहे की केरळचा हा प्रयोग अन्य राज्या मॉडेल बनेल, अशा शब्दांत भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वॉटर मेट्रोचे उद्घाटन तसेच केरळमधील पहिल्या वंदे भारत रेल्वेच्या उद्घाटनप्रसंगी आपल्या भावना व्यक्त केल्या.

पंतप्रधानांनी मल्याळम भाषेत उपस्थितांना संबोधित केले. ते म्हणाले की, काही दिवसांपूर्वी मल्याळी नववर्ष सुरू झाले आहे. विषु उत्सव साजरा केला गेला. मी पुन्हा एकदा या उत्सवाच्या शुभेच्छा देतो. मला आनंद आहे की, उल्हासाच्या या वातावरणाला केरळच्या विकासाशी जोडता येत आहे. केरळला आपली पहिली वंदे भारत ट्रेन मिळाली आहे. कोचीला वॉटर मेट्रोची भेट मिळाली आहे. रेल्वेशी जोडलेले अनेक प्रकल्प मिळाले आहेत. केरळ जागरुक, समजूतदार व शिक्षित लोकांचा प्रदेश आहे. येथील लोकांचे सामर्थ्य, विनम्रता व परिश्रम एक ओळख निर्माण करते. देशविदेशातील परिस्थितीची तुम्हाला अधिक जाणीव आहे. तुम्ही हे जाणता की, जगभरातील देशांची काय स्थिती आहे. अर्थव्यवस्था कशी आहे, वैश्विक अवस्थांच्या दरम्यानही हे जग भारताला विकासाचे केंद्र मानत आली आहे.

मोदींनी सांगितले की, भारतावर असलेल्या या भरवशामागे अनेक कारणे आहेत. केंद्रात एक निर्णायक सरकार, भारताच्या हितार्थ मोठे निर्णय घेणारे सरकार, केंद्र सरकारद्वारा आधुनिक इन्फ्रास्ट्रक्चरमधअये गुंतवणूक, तरुणांच्या कौशल्यावर गुंतवणूक, इज ऑफ डुईंग बिझनेस. राज्यांच्या विकासाचे सूत्र हेच देशाच्या विकासाचे सूत्रे आहे, यावर सरकार विश्वास ठेवते. केरळचा विकास होईल तेव्हाच देशाचाही विकास होईल, यावर आमचा भर आहे.

गेल्या ९ वर्षांत भारतात कनेक्टिव्हिटी पायाभूत सुविधांसाठी अभूतपूर्व प्रमाणात काम केले जात आहे. १० लाख कोटींहून अधिक पायाभूत सुविधांवर काम करत आहोत. कायाकल्प करण्याचा प्रयत्न आहे. २०१४ आधी केरळसाठी जे रेल्वे बजेट असे त्यात आता ५ टक्के अधिक वाढ केली आहे, असेही मोदींनी सांगितले.

आतापर्यंत जेवढ्या वंदे भारत एक्स्प्रेस ट्रेन चालल्या त्यांचे एक वैशिष्ट्य आहे की, त्या सांस्कृतिक पर्यटन स्थळांना जोडत आहे. उत्तर केरळ आणि दक्षिण केरळला जोडले जाईल. कोल्लम, कोट्यम एर्नाकुलम, त्रिशूर, कन्नूर अशा तीर्थस्थळांना जाणे सोपे होईल. ही वंदे भारत पर्यावरणाला नुकसान न पोहोचवता यात्रेचा उत्तम अनुभव देईल. आज तिरुवनंतरपुरम, शोरानुर सेमी हायस्पीड ट्रेनसाठी सज्ज होत आहेत. तिरुवनंतपुरम मंगलोर या अंतरात वेगवान ट्रेन धावू शकतील.

हे ही वाचा:

ठाणे पोलीस आयुक्तांसह एटीएस प्रमुख बनले ‘पोलीस महासंचालक’

मुंबई हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणाचे भारतात प्रत्यार्पण होण्याची शक्यता

डेथ वॉरंट निघालेय, पण नेमके कोणाचे…?

सुदानमध्ये अडकलेल्या भारतीयांना कावेरी मोहीम आणणार सुरक्षित मायदेशी

केरळला पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट

दोन दिवसांच्या केरळ दौऱ्यावर आलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळला पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसची भेट दिली. पंतप्रधान मोदी यांनी मंगळवारी सकाळी ११ वाजून १० मिनिटांनी तिरुवनंतपुरम सेंट्रल स्टेशनवरून तिरुवनंतपुरम आणि कासारगोड दरम्यान धावणाऱ्या राज्यातील पहिल्या वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. ही वंदे भारत एक्सप्रेस केरळ राज्यातल्या ११ जिल्ह्यांमध्ये धावणार आहे.

तत्पूर्वी पंतप्रधान सकाळीच तिरुवनंतपुरमला पोहोचले. तिरुवनंतपुरम येथे रोड शो केल्यानंतर ते मध्य रेल्वे स्थानकाकडे रवाना झाले. वंदे भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिरुवनंतपुरममध्ये डिजिटल सायन्स पार्कची पायाभरणी केली. तिरुवनंतपुरममध्ये त्यांनी विविध विकास प्रकल्पांचे उद्घाटनही केले.

वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवण्यापूर्वी पंतप्रधान मोदींनी वंदे भारतामधून प्रवास करणाऱ्या शाळकरी मुलांशी संवाद साधला. या बच्चे कंपनीने पंतप्रधानांना स्वतः काढलेली वंदे भारतएक्सप्रेसची चित्रे दाखवली. केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान, मुख्यमंत्री पिनाराई विजयन आणि काँग्रेस खासदार शशी थरूर हेही पंतप्रधानांसोबत उपस्थित होते. वडे भारत एक्सप्रेसनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील पहिल्या डिजिटल सायन्स पार्कचे अनावरण देखील केले.

देशातील पहिल्या वॉटर मेट्रोचे लोकार्पण

कोची शहराच्या पायाभूत सुविधांमध्ये भर घालणाऱ्या देशातील पहिल्या वॉटर टॅक्सीचे लोकार्पण देखील पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आले.  कोची आणि जवळपासच्या दहा बेटांना ही वॉटर मेट्रो जोडली गेली आहे. कोची वॉटर मेट्रो पहिल्या टप्प्यात हायकोर्ट-वायपिन टर्मिनल आणि विट्टीला-कक्कनड टर्मिनल दरम्यान सुरू करण्यात आली आहे. वॉटर मेट्रो प्रथम ८ इलेक्ट्रिक हायब्रीड बोटींसह सुरू होईल, नंतर त्यांची संख्या वाढविली जाईल. मेट्रो प्रमाणेच वॉटर मेट्रो पूर्णपणे वातानुकूलित असेल आणि दररोज १५ मिनिटांच्या अंतराने १२ तास सेवा देईल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा