31 C
Mumbai
Sunday, May 19, 2024
घरक्राईमनामाजगनमोहन रेड्डी यांच्या बहिणीने पोलिस कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात

जगनमोहन रेड्डी यांच्या बहिणीने पोलिस कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात

तेलंगाना पार्टीच्या नेता आणि आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण वाय.एस.शर्मिला यांनी पोलिसांना मारहाण केल्या प्रकरणी अटक करून त्याना १४ दिवसीय पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या भरती परीक्षेच्या कथित प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी तेलंगणामध्ये व्यापक निषेध व्यक्त केला जात आहे

Google News Follow

Related

वाय एस आर काँग्रेसच्या नेत्या व आंध्रचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्या भगिनी वाय. एस. शर्मिला या पोलिस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावल्याप्रकरणी अडचणीत सापडल्या आहेत. पोलिसांवर हात उचलल्याबद्दल त्यांना १४ दिवसांची कोठडी ठोठावण्यात आली आहे.

एका पेपर लीक प्रकरणासंदर्भात निषेध करत होत्या. यादरम्यान, त्या भरती परीक्षेतील कथित प्रश्न लीक झाल्याची चौकशी करत असलेल्या विशेष तपास पथकाच्या (एसआयटी) कार्यालयाकडे जात होत्या. यावेळी पोलिसांनी त्याला अडवले. त्यांनी आपली गाडी भरधाव नेली पण कसेही करून पोलिसांनी ती गाडी रोखली. तेव्हा त्यातून बाहेर पडत त्यांनी पोलिस कर्मचाऱ्यावर हात उगारला. पोलिसांनी त्यांना अडवल्याने त्यांच्यात बाचाबाची झाली. शर्मिला पोलिसांशी वाद घालत असताना शर्मिला यांनी पोलीस कर्मचाऱ्याच्या कानशिलात लगावली. पोलिसांनी लगेच शर्मिला यांची गठडी वळली आणि त्यांना पोलिस व्हॅनमध्ये टाकले.

वाय.एस.शर्मिला ह्या आंध्रप्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांची मुलगी असून आंध्रप्रदेश राज्याचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांची बहीण आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये पोलीस कर्मचारी शर्मिला यांची गाडी थांबवण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. गाडी थांबवल्यानंतर लगेचच त्या एका पोलिसाजवळ जातात आणि त्यांच्यावर हात उगारतात.

हे ही वाचा:

गावातील लोकांमध्ये फूट पाडून राजकीय पक्षांनी आपली दुकाने चालवली

भूकंपाच्या धक्क्याने मेघालय हादरले

अश्लील रॅप गाण्याच्या चित्रीकरणाच्या विरोधात अभाविपची पुणे विद्यापीठात जोरदार निदर्शने

हिजाबपेक्षा शिक्षणाला महत्व देत कर्नाटकची तबस्सुम शेख पीयूसी परीक्षेत टॉपर

वाय.एस.शर्मिला यांच्या आई वाय.एस. विजयम्मा, शर्मिला यांना भेटण्यासाठी हैदराबादमधील जुबली हिल्स पोलिस स्टेशनमध्ये पोहचल्या त्या देखील पोलीस कर्मचाऱ्यांना मारहाण करताना एका व्हिडिओत दिसत आहेत. विशेष म्हणजे, तेलंगणा राज्य लोकसेवा आयोगाने घेतलेल्या भरती परीक्षेच्या कथित प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी तेलंगणामध्ये व्यापक निषेध व्यक्त केला जात आहे. आरोप समोर आल्यापासून किमान ११ जणांना अटक करण्यात आली आहे आणि सरकारी रिक्त जागा भरण्यासाठीच्या तीन परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत.

कथित लीकवरून विरोधी पक्षांनी के चंद्रशेखर राव सरकारवर निशाणा साधला आहे. तेलंगणात स्वतंत्र राजकीय ओळख निर्माण करण्यासाठी अथक परिश्रम करणाऱ्या शर्मिला सातत्याने पेपरफुटीचा मुद्दा उपस्थित करत आहेत. या मुद्द्यावरून गेल्या महिन्यात हैदराबादमध्ये झालेल्या आंदोलनातून त्यांना ताब्यात घेण्यात आले होते. आंध्रचे माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांची मुलगी आणि जगन मोहन रेड्डी यांची धाकटी बहीण शर्मिला यांनी अलीकडेच त्यांच्या पक्षाच्या समर्थनार्थ संपूर्ण तेलंगणात मोर्चा काढला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
153,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा