31 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरविशेषहिजाबपेक्षा शिक्षणाला महत्व देत कर्नाटकची तबस्सुम शेख पीयूसी परीक्षेत टॉपर

हिजाबपेक्षा शिक्षणाला महत्व देत कर्नाटकची तबस्सुम शेख पीयूसी परीक्षेत टॉपर

६०० पैकी ५९३ गुण मिळवत कला शाखेत प्रथम

Google News Follow

Related

कर्नाटक सरकारने मागील वर्षी शाळेमध्ये हिजाब परिधानावर बंदी घातली होती.त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर तबस्सुम शेखलाही याचा सामना करावा लागला.मात्र एका वर्ष नंतर कर्नाटकामध्ये प्री युनिव्हर्सिटी कोर्स {पीयूसी} शिक्षण विभागाद्वारे आयोजित करण्यात आलेल्या द्वितीय परीक्षेचा निकाल घोषित करण्यात आला. त्यात तबस्सुम शेख हिने ६०० पैकी ५९३ गुण मिळवत कला शाखेत प्रथम क्रमांक पटकावला. यापैकी तिने हिंदी, मानसशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयांत परिपूर्ण १०० गुण मिळवले आहेत.

तबस्सुम शेखने आपल्या शैक्षणिक कामगिरीबद्दल प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, तिने हिजाबऐवजी शिक्षणाला प्राधान्य दिले.तबस्सुम शेख ही कर्नाटकातील बेंगळुरू येथील नागरत्नम्मा मेदा कस्तुरीरंगा सेट्टी राष्ट्रीय विद्यालय, एनएमकेआरव्हीची विद्यार्थिनी आहे.गेल्या वर्षी कर्नाटक उच्च न्यायालयाने शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाब किंवा बुरखा यासारख्या धार्मिक वेशभूषेवर बंदी घालण्याचा सरकारी आदेश कायम ठेवला आणि विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थांच्या ड्रेस कोडचे पालन करण्यास सांगितले.

हे ही वाचा:

खासदारकी रद्द झाल्यामुळे राहुल गांधींनी २० वर्षांनी सोडला बंगला

खारघर मध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्र !

अखेर ३६ दिवसांनी अमृतपाल पोलिसांच्या जाळ्यात

घरच्या मैदानात अजित पवारांनी केली मुख्यमंत्रीपदाची दावेदारी…

या निर्णयाविरोधात अनेक मुस्लीम विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते, अनेकांनी हिजाब आणि टोपी घालून वर्गात प्रवेश केला होता, तर अनेकांनी न्यायालयाच्या निर्णयाचे पालन करण्याचे आवाहन केल्यानंतर परीक्षेवर बहिष्कारही टाकला होता.’कॉलेजमध्ये हिजाब सोडून मी शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. आम्हाला शिक्षणासाठी काही त्याग करावा लागेल, असे शेख यांनी  सांगितले.

तबस्सुमने मीडियाला सांगितले की, कोर्टाचा आदेश येईपर्यंत ती दररोज हिजाब घालून तिच्या सर्व क्लासेसमध्ये जात असे. शिक्षण पुढे नेण्याची तिची इच्छा आणि आई-वडिलांकडून शिकलेल्या कायद्याचा आदर करण्याचे धडे यामुळे तिने हिजाब घालणे बंद करण्याचा निर्णय घेतला. तबस्सुम शेख हिजाब घालून कॉलेज कॅम्पसमध्ये जायची आणि क्लासला जाण्याआधी ती तो काढून नियमांचे पालन करत कॉलेज मध्ये प्रवेश करायची. ज्या दिवशी ती टॉपर म्हणून समोर आली, त्या दिवशी तिने हिजाब परिधान केला आणि प्राचार्यांची भेट घेतली आणि तिच्या निर्णयावर कोणीही आक्षेप घेतला नाही, असे तिने सांगितले.

तिचे वडील अब्दुल खौम शेख यांनी आपल्या मुलीला सांगितले की, “देशातील कायद्याचे पालन करणे महत्वाचे आहे. मुलांसाठी शिक्षण अधिक महत्त्वाचे आहे”.तबस्सुम शेख म्हणते, परीक्षेत ९५ टक्के गुण मिळतील अशी आशा होती मात्र आपला पहिला क्रमांक येईल असे स्वप्नही पाहिले नव्हते.सुप्रीम कोर्टाचे प्रसिद्ध वकील प्रशांत भुषण यांनीही ट्विट करत तबस्सुम शेख आणि तिच्या पालकांचे अभिनंदन केले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा