28.9 C
Mumbai
Friday, April 19, 2024
घरविशेष२ कोटी लोकांना एफएम सुरांची भेट

२ कोटी लोकांना एफएम सुरांची भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते ९१ एफएम ट्रान्समीटरचे उद्घाटन

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते शुक्रवारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे १८ राज्ये आणि २ केंद्रशासित प्रदेशांमध्ये ९१ एफएम ट्रान्समीटरचे उद्घाटन केले. आज आकाशवाणीच्या एफएम सेवेचा हा विस्तार ऑल इंडिया एफएम होण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे. ऑल इंडिया रेडिओच्या ९१ एफएम प्रसारणाचा हा शुभारंभ म्हणजे देशातल्या ८५ जिल्ह्यांतील २ कोटी लोकांना भेट असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.

पंतप्रधान म्हणाले की, गेल्या काही वर्षांत देशात झालेल्या तांत्रिक क्रांतीने रेडिओ आणि विशेषत: एफएमला नवे स्वरूप लाभले आहे. . इंटरनेटमुळे रेडिओ मागे पडला नाही, तर ऑनलाइन एफएम आणि पॉडकास्टच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण मार्गाने पुढे आला आहे. . डिजिटल इंडियामध्ये रेडिओला नवीन श्रोता वर्ग मिळाला. हवामानासंबंधी माहिती वेळेवर प्रसारित करण्यात ट्रान्समीटर महत्त्वाची भूमिका बजावतील आणि महिला बचत गटांसाठी ते उपयुक्त ठरतील, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला.  एफएम ट्रान्समिशनद्वारे या कनेक्टिव्हिटीचा आणखी एक आयाम आहे. हे एफएम प्रसारण देशातील सर्व भाषांमध्ये आणि विशेषत: २७ बोली असलेल्या भागात प्रसारित केले जाईल असेहो पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

काही दिवसांनी मी रेडिओवर ‘मन की बात’चा १०० वा भाग सादर करणार आहे. ‘मन की बात’चा हा अनुभव, देशवासीयांशी असे भावनिक संबंध केवळ रेडिओमुळेच जुळणे शक्य झाले. अशा प्रकारे मी देशवासीयांच्या सामर्थ्याशी आणि सामूहिक कर्तव्याशी जोडलेले राहू शकलो असे सांगून पंतप्रधान म्हणाले, आमचे सरकार तंत्रज्ञानाच्या लोकशाहीकरणासाठी सतत काम करत आहे. भारताला आपल्या क्षमतेचा पुरेपूर वापर करता यावा, यासाठी कोणत्याही भारतीयाला संधींची कमतरता भासू नये. आधुनिक तंत्रज्ञान सर्वांना सुलभ आणि परवडणारे बनवणे हे याचे एक प्रमुख माध्यम आहे.

माहितीचा वेळेवर प्रसार, शेतीसाठी हवामान अंदाज, किंवा महिला बचत गटांना नवीन बाजारपेठेशी जोडणे यामध्ये एफएम ट्रान्समीटर महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास पंतप्रधानांनी यावेळी व्यक्त केला. रेडिओच्या माध्यमातून मन की बात कार्यक्रमाद्वारे स्वच्छता अभियान, बेटी बचाव, बेटी पढाव यासारख्या उपक्रमांना लोकचळवळीचे स्वरूप आल्याचे पंतप्रधानांनी यावेळी सांगितले.

हे ही वाचा:

अलास्कामध्ये लष्कराची दोन हेलिकॉप्टर हवेत धडकली, तीन सैनिकांचा मृत्यू

शारजाच्या तुरुंगात क्रिसन परेराला केस धुण्यासाठी वापरावा लागला डिटर्जंट

आंतरजातीय विवाहाच्या विरोधातून पित्याने मुलीसह पत्नीवर काढला राग

‘द केरळ स्टोरी’ : हिंदू, ख्रिश्चन मुलींना दहशतवादी बनवण्याचा हृदयद्रावक प्रवास

आज ९१ एफएम ट्रान्समीटरचे उद्घाटन होत आहे हे ऐतिहासिक पाऊल आहे. मनोरंजन, खेळ आणि शेतीशी संबंधित माहिती स्थानिक लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते खूप उपयुक्त ठरेल. मन की बातमुळे रेडिओची लोकप्रियता वाढली आहे असे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यावेळी म्हणाले.

महाराष्ट्रात सात ठिकाणी एफएम केंद्रांचा शुभारंभ
पंतप्रधानांच्या हस्ते महाराष्ट्रातील दुर्गम भागातील ७ एफएम केंद्रांचाही शुभारंभ झाला. या सोहळ्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी यावेळी महाराष्ट्रातील गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा, अहेरी तसेच नंदूरबार, हिंगोली, वाशिम, अचलपूर, सटाणा या सात ठिकाणी एमएफ सेंटर्सचा शुभारंभ करण्यात आला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
147,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा