28 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरविशेष'द केरळ स्टोरी' : हिंदू, ख्रिश्चन मुलींना दहशतवादी बनवण्याचा हृदयद्रावक प्रवास

‘द केरळ स्टोरी’ : हिंदू, ख्रिश्चन मुलींना दहशतवादी बनवण्याचा हृदयद्रावक प्रवास

'द केरळ स्टोरी' या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज

Google News Follow

Related

‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला. ही कहाणी आहे, ज्या मुलींची त्यांना नर्स बनून सेवा करायची होती. परंतु त्यांच्या नशिबात काहीतरी वेगळेच वाढून ठेवले होते. दुर्दैवाने त्या इसिसच्या दहशतवादी बनल्या. त्यांचे धर्मांतर करण्यात आले. केरळमधील असंख्य हिंदू आणि ख्रिश्चन मुलींना लव्ह जिहादच्या जाळ्यात अडकवून त्यांचे धर्मांतर करण्यात आले. हा चित्रपट ५ मे २०२३ रोजी प्रदर्शित होत आहे. सुदीप्तो सेन यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. विपुल अमृतलाल शहा हे चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक आहेत.

काय आहे या चित्रपटाची कथा?

अदा शर्मा, योगिता बिहानी, सोनिया बानी, सिद्धी इदनानी या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. केरळ स्टोरीच्या ट्रेलरमध्ये अदा शर्माचा दमदार अभिनय पाहायला मिळाला आहे. या चित्रपटात ती शाली उन्नीकृष्णन हिच्या भूमिकेत दिसणार आहे. हिंदू कुटुंबातील शालिनी आता फातिमा बनली आहे. ट्रेलरच्या सुरुवातीला शालिनीला इसिसमध्ये सामील होण्यासंदर्भात प्रश्न विचारले जात आहेत. ती अधिकाऱ्यांना सांगते, मी आयसिसमध्ये कधी सामील झाले, यापेक्षा मी आयसिसमध्ये का आणि कशी सामील झाले, हे जाणून घेणे अधिक महत्वाचे आहे.

या चित्रपटात निरपराध हिंदू मुलींची कशी दिशाभूल केली जाते, हे यात दाखवण्यात आले आहे. त्यांचे ब्रेनवॉश केले जाते आणि त्यांना अल्लाहच्या जवळ आणले जाते. हिजाब घातलेल्या मुलींवर कधीही बलात्कार किंवा अत्याचार होणार नाहीत, याची त्यांना खात्री दिली जाते. मग या मुली इस्लाम धर्म स्वीकारतात. त्यांना इसिसच्या दहशतवाद्यांमध्ये आणले जाते. मग सुरू होते ते भीतीदायक दृश्य. ज्याची या मुलींनी कधी कल्पनाही केली नव्हती. माणुसकीच्या नावाला काळीमा म्हणजे काय असतो ते त्यांना तिथे अनुभवास येते. इसिसच्या दहशतवाद्यांचा कुरूप चेहरा या मुलींची मने हादरवून टाकतो.

हेही वाचा :

दुबईच्या तुरुंगात अडकलेली अभिनेत्री अखेर सुटली

तो शिकवत होता, फक्त १५ मिनिटांत एटीएम फोडण्याचं तंत्र…

दिशाभूल करणाऱ्या जाहिराती काढून टाकण्याचा बोर्नव्हिटाला आदेश

प्रोबेशनरी महिला पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत

ही गोष्ट फक्त शालिनीची नाही. खरं तर तिच्यासारख्या ३२ हजार महिला केरळमधून बेपत्ता झाल्या आहेत. ट्रेलरच्या शेवटी अदा शर्मा म्हणते, माझ्यासारख्या हजारो मुली आहेत, ज्या आपल्या घरातून पळून या वाळवंटात दफन झाल्या आहेत.

ट्रेलर लोकांच्या पसंतीस

केरळ स्टोरीचा ट्रेलर आश्वासक आहे. चित्रपटाचा ट्रेलर आणि अदाच्या अभिनयाचे सोशल मीडियावर भरभरून कौतुक होत आहे. द केरळ स्टोरी हा सत्य घटनेवर आधारित चित्रपट आहे. भारताविरोधात इसिसच्या दहशतवाद्यांचे हे घाणेरडे षडयंत्र उघडकीस आल्यानंतर संपूर्ण देश हादरला होता. सगळीकडे एकच खळबळ उडाली होती. आता ही हृदयद्रावक सत्य घटना तुम्हाला पडद्यावर पाहता येणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा