32 C
Mumbai
Sunday, June 4, 2023
घरक्राईमनामाप्रोबेशनरी महिला पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत

प्रोबेशनरी महिला पोलीस अधिकाऱ्याचा मृतदेह आढळला कुजलेल्या अवस्थेत

नेहरू नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Google News Follow

Related

प्रोबेशनरी अधिकारी म्हणून नेहरू नगर पोलीस ठाण्यात दीड वर्षांपूर्वी नेमणूक झालेल्या ३५ वर्षीय महिला पोलीस उपनिरीक्षक शीतल एडके यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात कुजलेल्या अवस्थेत बुधवारी रात्री आढळून आला आहे.शीतल एडके अविवाहित असून त्या घरी एकट्याच राहात होत्या. त्यांचा मृत्यु दीर्घ आजारामुळे झाला असावा असा कयास लावण्यात येत आहे. या प्रकरणी नेहरू नगर पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

शीतल एडके या पालघर पोलीस दलात पोलीस शिपाई होत्या, विभागीय परीक्षा देऊन त्या पोलीस अधिकारी झाल्या होत्या. दीड वर्षांपूर्वी शीतल यांची नेमणूक मुंबईत झाल्यानंतर दीड वर्षांपूर्वी त्या नेहरू नगर पोलीस ठाण्यात रुजू झाल्या होत्या. अविवाहित शीतल एडके या मूळच्या अहमदनगर जिल्ह्यात राहणाऱ्या असून अविवाहित होत्या. नेहरू नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कामगार नगर येथे त्या भाडेतत्वावर राहण्यास होत्या.

नेहरू नगर पोलीस ठाण्यात रुजू झाल्यानंतर तीन ते चार महिने नोकरी केल्यानंतर दीर्घकाळासाठी आजरपणाच्या सुट्टीवर गेल्या. बुधवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शीतल एडके यांचे फ्लॅटला आतून कडी असून फ्लॅट मधून दुर्गंधी येत असल्याची तक्रार शेजाऱ्यांनी नेहरू नगर पोलीस ठाण्यात केली. घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने दार तोडून आता प्रवेश केला असता शीतल एडके यांचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला अशी माहिती पोलिस उपायुक्त हेमराजसिंग राजपूत यांनी दिली.

हे ही वाचा:

आतिक अहमदच्या कार्यालयात आढळलेले रक्ताचे डाग माणसाचेच!

दुबईच्या तुरुंगात अडकलेली अभिनेत्री अखेर सुटली

दिशाभूल करणाऱ्या जाहिराती काढून टाकण्याचा बोर्नव्हिटाला आदेश

‘लढाऊ’ शिवांगी राफेलमधून घडवणार इतिहास

पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन तो पूर्व तपासणीसाठी राजावाडी रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शीतल एडके यांच्या घराबाहेर दाराला २३ एप्रिल रोजीचे वृत्तपत्र आढळून आल्यामुळे २२ एप्रिल रोजी त्यांचा मृत्यू झाला असावा असा कयास लावण्यात येत आहे. याप्रकरणी नेहरू नगर पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली असून शीतल एडके यांच्या राहत्या गावी कुटुंबांना कळविण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,850चाहतेआवड दर्शवा
2,022अनुयायीअनुकरण करा
76,400सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा