29.9 C
Mumbai
Friday, March 29, 2024
घरविशेषशारजाच्या तुरुंगात क्रिसन परेराला केस धुण्यासाठी वापरावा लागला डिटर्जंट

शारजाच्या तुरुंगात क्रिसन परेराला केस धुण्यासाठी वापरावा लागला डिटर्जंट

अँथनी पॉलने फसवणूक करत अमली पदार्थ तस्करी प्रकरणात अभिनेत्रीला अडकवले होते

Google News Follow

Related

अमली पदार्थांच्या तस्करीप्रकरणी अडकवले गेल्याने शारजामध्ये तुरुंगवास भोगावा लागलेली अभिनेत्री क्रिसन परेरा हिला तिथे भयानक यातनेला सामोरे जावे लागले होते. तिने लिहिलेल्या चिठ्ठीत तिला कपड्याच्या साबणाने केस धुवावे लागल्याचे आणि टॉयलेटमधील पाण्याने कॉफी बनवावी लागल्याचे म्हटले आहे.

बेकरीमालक अँथनी पॉल याने क्रिसनला अमली पदार्थांच्या तस्करीत अडकवल्याचा आरोप आहे. या प्रकरणी गुन्हे शाखेने त्याला आणि त्याचा सहकारी राजेश बोभाटे याला अटक केली आहे. अमली तस्करीच्या आरोपाखाली क्रिसनला २ एप्रिल रोजी अटक करण्यात आली होती. जवळपास महिनाभर शारजामधील तुरुंगात काढल्यानंतर बुधवारीच तिची सुटका झाली. तिचा भाऊ केविन याने तिची चिठ्ठी सोशल मीडियावर टाकल्यानंतर हा प्रकार समोर आला. क्रिसनची तुरुंगातून जरी सुटका झाली असली तरी कादेयशीर बाबी आणि कागदपत्रांवर स्वाक्षरी केल्यानंतर ती भारतात परतू शकणार आहे. मात्र ती भारतात नेमकी कधी परतेल, याबाबत तिच्या कुटुंबीयांनाही कल्पना नाही.

हे ही वाचा:

बसमध्ये इयरफोनशिवाय व्हीडिओ, ऑडिओ ऐकलात तर कान पकडणार!

सरकारी बंगला बांधण्यासाठी चक्क ऐतिहासिक वास्तू केली जमीनदोस्त

राज म्हणतात, जपून रहा उद्धव म्हणतात बदला घेणार

माहूरगडावर रेणुकामातेच्या दर्शनाला जा आता लिफ्टने!

 

क्रिसनला अमली पदार्थांच्या तस्करीत अडकवल्याचे उघडकीस आल्यानंतर तिच्याबाबत अनेकांनी सहानुभूती दर्शवली. त्यामुळे तिने लिहिलेल्या चिठ्ठीत या समर्थकांना योद्धे असे संबोधून त्यांचे आभार मानले आहेत. ‘माझ्या प्रिय योद्ध्यांनो, जवळपास तीन आठवडे आणि पाच दिवसांनंतर मल लिहिण्यासाठी कागद आणि पेन मिळाला आहे. टाइड साबणाने केस धुतल्यानंतर आणि टॉयलेटमधील पाण्याने कॉफी बनवल्यानंतर मी बॉलिवूडचे सिनेमे पाहिले. ते पाहताना माझ्या इच्छा-आकांक्षामुळेच माझ्यावर ही परिस्थिती ओढवली, या विचाराने काही वेळा माझे डोळे पाणावले होते. पण काही वेळा टीव्हीवर आपली संस्कृती, संगीत आणि ओळखीचे चेहरे पाहताना मी हसलेही. मी भारतीय असल्याचा आणि मी भारतीय चित्रपट सृष्टीचा भाग असल्याचा मला गर्व आहे,’ असे तिने या चिठ्ठीत म्हटले आहे. या अवघड प्रसंगात तिची साथ देणारे आणि तिच्यावर विश्वास ठेवणारे तिचे आई, वडील, भाऊ, भारतीय आणि यूएईचे पोलिस अधिकारी, चर्च आणि प्रसारमाध्यमे यांचेही तिने आभार मानले आहेत.

बेकरीचे काम सुशेगाद

अमली पदार्थ तस्करी प्रकरणातला आरोपी अँथनी पॉल हा बोरिवलीतील आयसी कॉलनीमध्ये ‘अवर डेली ब्रेड’ नावाची बेकरी चालवतो. गुरुवारीही त्याची बेकरी व्यवस्थित सुरू होती. ही बेकरी गेल्याच वर्षी सुरू झाली आहे. पॉल वरचेवर तिथल्या स्टुलावर बसत असे. तिथल्या कर्मचाऱ्यांनाही त्याच्याबाबतचे वृत्त वाचून धक्का बसला आहे. परंतु त्याचा कोणताही परिणाम बेकरीवर झाला नसल्याचे ते सांगतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
144,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा