30 C
Mumbai
Saturday, May 27, 2023
घरविशेषबसमध्ये इयरफोनशिवाय ऑडिओ, व्हिडिओ ऐकले तर ५ हजारांचा दंड, तीन महिने शिक्षा

बसमध्ये इयरफोनशिवाय ऑडिओ, व्हिडिओ ऐकले तर ५ हजारांचा दंड, तीन महिने शिक्षा

सहप्रवाशांचा हा ताप कमी करण्यासाठी आता बेस्ट प्रशासनाने पाऊल उचलले आहे. 

Google News Follow

Related

बेस्ट बसमध्ये इयरफोन न लावता गाणी ऐकणे, व्हीडिओ पाहणे आता अंगलट येणार आहे. बेस्ट प्रशासनाने याविरोधात कारवाई करण्याचे संकेत दिल्यानंतर आता लोकांनी त्याचे स्वागत केले आहे.

बेस्ट बसमधून प्रवास करताना मोठ्या आवाजात गाणी किंवा ऑडिओ व्हीडीओ क्लिप्स ऐकल्यास किंवा मोठ्याने बोलल्यास तब्बल पाच हजार रुपयांपर्यंतचा दंड आकारला जाईल किंवा तीन महिन्यांपर्यंतचा तुरुंगवासही घडू शकतो.

अद्ययावत फोन प्रत्येकाच्या हातात आल्यापासून त्याच्यावर मोठ्याने बोलणे, स्वत:पुरती गाणी न ऐकता आजूबाजूच्या सहप्रवाशांनाही ऐकू जाईल, इतक्या मोठ्या आवाज ती लावणे, किंवा व्हीडिओ कॉलवर इअरफोन न लावता बोलून सर्व संभाषण सहप्रवाशांना ऐकवणे… असे प्रकार सातत्याने दिसून येतात. सहप्रवाशांचा हा ताप कमी करण्यासाठी आता बेस्ट प्रशासनाने पाऊल उचलले आहे.

‘या संदर्भातील सूचना सर्व बसगाड्यांमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे. एखाद्या प्रवाशाविरोधात तक्रार आल्यास बसमधील चालक, वाहक किंवा तिकीट तपासनीसांकडून त्या प्रवाशाला सुरुवातीला समज दिली जाईल. अन्यथा त्या प्रवाशाला पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावे लागेल,’ असे बेस्ट उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र यांनी सांगितले.

हे ही वाचा:

राज म्हणतात, जपून रहा उद्धव म्हणतात बदला घेणार!

आंदोलक कुस्तीगीर आणि धावपटू पीटी उषा यांच्यात संघर्ष

राज म्हणतात, जपून रहा उद्धव म्हणतात बदला घेणार

माहूरगडावर रेणुकामातेच्या दर्शनाला जा आता लिफ्टने!

अनेक प्रवासी दिवसभराच्या कामाने थकलेले असतात आणि आमच्या बसने प्रवास करत असतात किंवा त्यांना कामासाठी जाताना शांतपणे प्रवास करायचा असतो. काहीजण या प्रवासादरम्यान डुलकीही काढतात. मोठ्या आवाजाने त्यांना त्रास होऊ नये, अशी आमची इच्छा आहे, असे स्पष्टीकरण लोकेश चंद्र यांनी दिले.

‘परिवहन सेवा ही सार्वजनिक असून बसमधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास अन्य प्रवाशांकडून होऊ नये, यासाठी मुंबई पोलिस कायद्यांतर्गत प्रवाशांवर कारवाई होऊ शकते,’ असे बेस्ट उपक्रमाने काढलेल्या पत्रकात स्पष्ट केले आहे. त्यामुळे इअरफोनशिवाय मोबाइलवर ऑडिओ, व्हीडिओ ऐकण्यास, बघण्यास तसेच, मोठ्या आवाजात बोलण्यास मनाई करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे.

मुंबई पोलिसांचे कलम ३८ काय म्हणते?

अशा प्रवाशांवर कारवाईसाठी मुंबई पोलिस कलम ३८चा आधार घेण्यात आला आहे. या कायद्यानुसार, सार्वजनिक ठिकाणी गायन, वादन, आवाज किंवा गोंगाट केल्यास कारवाई केली जाते. आवाज करणाऱ्यांकडून हजार ते बाराशे रुपये दंड आकारला जातो.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

आम्हाला follow करा

49,852चाहतेआवड दर्शवा
2,021अनुयायीअनुकरण करा
74,300सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा