उत्तर प्रदेशातील आणखी एका मशिदीवर बुलडोझर कारवाई करण्यात आली आहे. रविवारी (९ फेब्रुवारी) कुशीनगरमधील मदनी मशिदीवर ही कारवाई करण्यात आली. सरकारी जमिनीवर मशीद बांधल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी तक्रार आल्यानंतर मुख्यमंत्री योगी यांनी प्रशासनाला कारवाई सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर प्रशासनाने कारवाई करत मशिदीच्या बेकायदेशीर भाग बुलडोजर लावून जमीनदोस्त केला आहे.
हिंदू नेते राम बचन सिंह यांनी मुख्यमंत्री योगी यांच्याकडे याबद्दल तक्रार केली होती. मशिदीच्या बेकादेशीर बांधकामाची तक्रार आल्यानंतर गेल्या वर्षी १८ डिसेंबर रोजी त्याची चौकशी सुरू करण्यात आली. तक्रारीनंतर योगी सरकारकडून चौकशीचे आदेश देण्यात आले. या प्रकरणी मदीना मशिदीच्या इंतेजामिया कमिटीने जमीन नोंदणी कागदपत्रसादर करत आपली बाजू मांडली होती. मात्र, जिल्हा प्रशासनाच्या चौकशीमध्ये मशिदीचा काही भाग सरकारी जमिनीवर बांधल्याचे बांधलेला आढळून आले.
हे ही वाचा :
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाकुंभमध्ये होणार सहभागी, त्रिवेणी संगमात करणार स्नान!
छत्तीसगडमध्ये चकमक: दोन जवान हुतात्मा, ३१ नक्षली ठार!
‘ॲपकॉन २०२५’ च्या ५ व्या आंतरराष्ट्रीय आणि १४ व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
१३ फेब्रुवारीनंतर ठरणार दिल्लीचा मुख्यमंत्री !
बेकायदेशीर बांधकामावर तोडक कारवाई होणार तोच मुस्लिम पक्षकारांनी उच्च न्यायालयाकडून ८ फेब्रुवारीपर्यंत स्थगिती मिळवून योगींच्या बुलडोझरवर ब्रेक लावला. मात्र, स्थगिती संपताच आज प्रशासनाने कारवाई करण्यास सुरुवात केली. चार-पाच बुलडोजर लावून बेकायदेशीर बांधकाम तोडण्यात आले. कारवाई दरम्यान मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
मदनी मस्जिद.. स्वाहा 🔥
कुशीनगर UP में मुसलमानों ने बगैर नक़्शे और परमिशन के बना लिया था जिहाद का अड्डा
आज कोर्ट के आदेश पर इसे मिट्टी में मिला दिया गया✍️
जय हो @myogiadityanath जी ✊ pic.twitter.com/owNpwoK3U8
— Deepak Sharma (@SonOfBharat7) February 9, 2025