30.4 C
Mumbai
Saturday, October 24, 2026
घरविशेषएकनाथ शिंदे यांच्याकडून शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबीयांना ३२ लाखांची मदत

एकनाथ शिंदे यांच्याकडून शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबीयांना ३२ लाखांची मदत

मोरे यांनी केली होती कर्जामुळे आत्महत्या

Google News Follow

तुकाराम महाराजांचे वंशज, दिवंगत कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. आज आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांनी मोरे कुटूंबियांना ३२ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे.

देहूमधील कीर्तनकार शिरीष महाराज मोरे यांनी गेल्याच आठवड्यात आर्थिक विवंचनेला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यांनी मृत्यूपूर्वी लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत आपल्यावर 32 लाखांचे कर्ज झाले असून ते फेडणे शक्य होत नसल्याने आपण टोकाचे पाऊल उचलत असल्याचे लिहिले होते. त्यांनी असा टोकाचा निर्णय घेऊन अकाली जीवन संपवल्याने देहू नगरीत मोठी हळहळ व्यक्त केली गेली होती.

हेही वाचा..

उत्तर प्रदेश: मदनी मशिदीच्या बेकायदेशीर बांधकामावर बुलडोजर!

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाकुंभमध्ये होणार सहभागी, त्रिवेणी संगमात करणार स्नान!

छत्तीसगडमध्ये चकमक: दोन जवान हुतात्मा, ३१ नक्षली ठार!

‘ॲपकॉन २०२५’ च्या ५ व्या आंतरराष्ट्रीय आणि १४ व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन

दिवंगत मोरे यांच्या जाण्याने त्यांच्या कुटूंबाला बसलेला धक्का पाहून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटूंबाला मदतीचा हात देण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे यांनी त्याना ३२ लाख रुपयांची मदत देण्याचा निर्णय घेतला असून ही मदत घेऊन त्यांनी आमदार विजय शिवतारे यांना आजच शिरीष महाराज मोरे यांच्याघरी जाऊन ही मदत त्यांच्या कुटूंबियांना सुपूर्द करण्यास सांगण्यात आले आहे.

आपल्या पश्चात आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत करण्याची विनंती शिरीष महाराज मोरे यांनी आपल्या मृत्यूपूर्वी लिहिलेल्या पत्रातून सर्व मित्रमंडळींना केली होती. त्यांच्या याला साद देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोरे कुटूंबाला आर्थिक विवंचनेतून बाहेर काढण्यासाठी आपला मदतीचा हात पुढे केला आहे.

National Stock Exchange
spot_img

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा