‘असोसिएशन्स ऑफ आयुर्वेदीक प्रॅक्टीशनर्स’ यांच्यातर्फे ‘ॲपकॉन २०२५’ च्या (AAPCON) ५ व्या आंतरराष्ट्रीय आणि १४ व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईमध्ये ५, ६,७ एप्रिल २०२५ रोजी ही परिषद पार पडणार आहे. मुंबईतील वांद्रे, बँडस्टँड येथील ‘हॉटेल ताज लँड्स एंड’ येथे या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. परिषद यशस्वी होण्याकरीता जास्तीत जास्त लोकांना सहभागी होण्याचे आवाहन ‘असोसिएशन्स ऑफ आयुर्वेदीक प्रॅक्टीशनर्स’ यांच्यातर्फे करण्यात आले आहे. या वर्षीची थीम “औषधंजगतः सेतु” आहे.
आयुर्वेदिक प्रॅक्टिशनर्स असोसिएशनने २०१८ मध्ये त्यांचा हॉटेल ताज पॅलेसमध्ये रौप्य महोत्सवी कार्यक्रम साजरा केला होता. त्यानंतर आता ‘ॲपकॉन २०२५’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात लाइव्ह कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध विशेष संत्रामध्ये जगभरातील वक्ते संबोधन करणार आहेत. डिजिटल मार्केटिंग आणि जागतिक संधी यावर एक सत्र आयोजित आहे. तर प्रॅक्टिशनरच्या औद्योगिक संबंधांवर एक सत्र, कॉर्पोरेट हॉस्पिटलमधील संधींवर एक सत्र आणि फार्मा उद्योगावरही एक सत्र आयोजित करण्यात आले आहे.
हे ही वाचा :
दिल्ली निकालाची जागतिक माध्यमांनी घेतली दखल
१३ फेब्रुवारीनंतर ठरणार दिल्लीचा मुख्यमंत्री !
‘दिल्ली की जीत हमारी है। २०२६ में बंगाल की बारी है’
आतिशी यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा!