32 C
Mumbai
Monday, March 17, 2025
घरविशेष'दिल्ली की जीत हमारी है। २०२६ में बंगाल की बारी है'

‘दिल्ली की जीत हमारी है। २०२६ में बंगाल की बारी है’

भाजपचा ममता बॅनर्जींना इशारा

Google News Follow

Related

दिल्लीत भाजपाचा विजय झाल्यानंतर विरोधी गटाच्या नेत्यांची बोलती बंद झाली आहे. विशेष म्हणजे, निवडणुकीत राहुल गांधींच्या काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. २७ वर्षानंतर राजधानी पुन्हा भाजपा आल्यानंतर देशभरात चर्चा आहे. हरियाणा, महाराष्ट्र आणि आता दिल्ली काबीज केल्यानंतर पुढील राज्याच्या विधानसभेकडे पक्षाची नजर असल्याचे बोलले जात आहे.

अशातच भाजपा नेते शुभेंदू अधिकारी यांनी ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेसला थेट इशारा दिला आहे. पश्चिम बंगाल हे पुढील राज्य असेल जिथे आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपा जिंकेल असे शुभेंदू अधिकारी म्हणाले आहेत. ‘दिल्ली की जीत हमारी है। २०२६ में बंगाल की बारी है’ (दिल्लीमध्ये हा आपला विजय आहे. २०२६ मध्ये आता ते करण्याची बंगालची पाळी आहे),” असे शुभेंदू अधिकारी म्हणाले आहेत. शनिवारी (८ फेब्रुवारी) पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

पश्चिम बंगालमधील विरोधी पक्ष असलेला भाजप २०११ पासून सत्तेत असलेल्या ममता बॅनर्जी यांचे राज्य संपुष्टात आणण्याचे ध्येय ठेवून आहे. २८८ जागा असलेल्या राज्याच्या विधानसभेची पुढील वर्षी निवडणूक होणार आहे. याच दरम्यान, शुभेंदू अधिकारी यांनी ‘आप’वर टीका करत ममता बॅनर्जींना इशारा दिला आहे. ते म्हणाले, दिल्लीतील आपत्तीचा (आप) शेवट झाला आहे आणि राष्ट्रीय राजधानीत राहणाऱ्या बंगाली लोकांनी भाजपला मतदान केले आहे.

आप-दा की विदाई हो गई है’ (आपत्ती संपली आहे). जनतेने त्यांना (आप) योग्य उत्तर दिले आहे. ते पुढे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदींच दिल्लीचे वैभव परत आणू शकतात आणि स्वच्छ शहर बनवू शकतात. मी दिल्लीच्या बंगाली बहुल भागात प्रचार केला, पण पायाभूत सुविधांची परिस्थिती खूपच वाईट आहे. त्यांनी दिल्ली उद्ध्वस्त केली होती. दिल्लीतील बहुतेक बंगाली बहुल भागात भाजपला सहज विजय मिळाला,” असे ते म्हणाले.

हे ही वाचा : 

छत्तीसगडच्या साई टंगरटोली गावातील ग्रामस्थांनी इस्लाम स्वीकारला !

आतिशी यांनी दिला मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा!

होईल का ऑपरेशन नौ दो ग्यारह ?

आम आदमी पक्षाची चौकशी करणार, लुटलेल्याची भरपाई करावी लागणार!

ते पुढे म्हणाले, पश्चिम बंगाल विधानसभेतील विरोधी पक्षनेते असलेले अधिकारी यांनी दिल्लीतील विजयाबद्दल पंतप्रधान मोदींचे अभिनंदन केले आणि ‘आप’ विरुद्ध निर्णायक जनादेश असल्याचे म्हटले. फर्जीवाल (केजरीवाल) यांना सत्तेतून काढून टाकल्यामुळे दिल्लीतील लोकांना राष्ट्रीय राजधानीत डबल इंजिन सरकारचे फायदे मिळतील.

ममता बॅनर्जी यांना इशारा देत पुढे म्हणाले, “दिल्लीचा विजय आमचा आहे, २०२६ मध्ये बंगालची पाळी येईल. दिल्लीप्रमाणे आता बंगालमध्येही बदलाची वेळ आली आहे. दिल्लीप्रमाणे बंगालमध्येही भाजपची लाट येईल आणि राष्ट्रवादी सरकार स्थापन होईल, असे अधिकारी म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
236,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा