छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्यात रविवारी (९ फेब्रुवारी) सुरक्षा दल आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. या चकमकीत दोन जवानांना वीरगती प्राप्त झाली असून दोन जवान जखमी झाले आहेत. सुरक्षा दलाच्या या कारवाईत ३१ नक्षलवादी ठार झाले आहेत. आज (९ फेब्रुवारी) सकाळी इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरातील जंगलात वेगवेगळ्या सुरक्षा दलांच्या जवानांचे संयुक्त पथक नक्षलविरोधी मोहिमेवर असताना ही चकमक घडली.
आयजी बस्तर पी सुंदरराज यांनी सांगितले की, विजापूर आणि नारायणपूरला लागून असलेल्या महाराष्ट्र सीमेवरील इंद्रावती राष्ट्रीय उद्यान परिसरातील जंगलात सुरक्षा कर्मचाऱ्यांचे एक पथक नक्षलविरोधी कारवाईवर असताना ही चकमक झाली. चकमकीत चार जवान जखमी झाले, ज्यांना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान दोन जवान हुतात्मा झाले तर दोन जवानांची प्रकृती स्थिर आहे. या चकमकीमध्ये सुरक्षा दलाने ३१ नक्षलवाद्यांना ठार केले. सुरक्षा दलाकडून परिसरात शोध मोहीम सुरु आहे.
या सर्वांचे मृतदेह सापडले आहेत. आम्ही त्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न करत आहोत, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. अधिकाऱ्याने सांगितले, चकमकीच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात AK-४७, SLR, INSAS रायफल्स, .३०३, BGL लाँचर शस्त्रे आणि स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. परिसरात अतिरिक्त सैन्याची तुकडी पाठविण्यात आली असून शोध मोहीम सुरु आहे.
हे ही वाचा :
‘ॲपकॉन २०२५’ च्या ५ व्या आंतरराष्ट्रीय आणि १४ व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
दिल्ली निकालाची जागतिक माध्यमांनी घेतली दखल
‘दिल्ली की जीत हमारी है। २०२६ में बंगाल की बारी है’
छत्तीसगडच्या साई टंगरटोली गावातील ग्रामस्थांनी इस्लाम स्वीकारला !