राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या (१० फेब्रुवारी) प्रयागराजमध्ये दाखल होणार आहेत. महाकुंभ मेळ्यात सहभागी होत त्या पवित्र त्रिवेणी संगमात स्नान करणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतीच महाकुंभ मेळ्याला भेट दिली होती. भगवे वस्त्र, गळ्यात आणि हातात रुद्राक्षांच्या माळा घालून पंतप्रधान मोदींनी संगमात स्नान केले होते. दरम्यान, राष्ट्रपतींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर प्रयागराजमध्ये सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रयागराजमध्ये आठ तासांपेक्षा जास्त काळ राहणार आहे आणि या काळात, संगमात स्नान करण्यासोबतच, त्या अक्षयवट आणि बडे हनुमान मंदिरालाही भेट देणार आहेत, पूजा करणार आहेत. देशवासीयांच्या सुख आणि समृद्धीसाठी राष्ट्रपती प्रार्थना करणार आहेत. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ देखील उपस्थित राहणार आहेत.
हे ही वाचा :
‘ॲपकॉन २०२५’ च्या ५ व्या आंतरराष्ट्रीय आणि १४ व्या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन
छत्तीसगडमध्ये चकमक: दोन जवान हुतात्मा, ३१ नक्षली ठार!
१३ फेब्रुवारीनंतर ठरणार दिल्लीचा मुख्यमंत्री !
‘दिल्ली की जीत हमारी है। २०२६ में बंगाल की बारी है’