दिल्ली विधानसभा निवडणुकीत मुस्तफाबाद या मतदारसंघातून भाजपाचे मोहन बिष्ट यांचा प्रचंड बहुमताने विजय झाला. आम आदमी पक्षाच्या आदिल अहमद खान यांचा १७५७८ मतांनी त्यांनी पराभव केला. या विजयानंतर त्यांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
ते म्हणाले की, अधिकृत आकडेवारीवरून हे स्पष्ट होते की, इथे मुस्लिम ४५ टक्के आहेत. मात्र मी जेव्हा या विभागात फिरलो तेव्हा मुस्लिमांची संख्या ६० टक्के असल्याचे दिसले. तर हिंदूंची लोकसंख्या ४० टक्के आहे, हेदेखील स्पष्ट झाले. आता आम्ही जनगणना करू आणि मुस्तफाबादचे शिवविहार किंवा शिवपुरी असे नामकरण करू.
या निवडणुकीतील विजयाबद्दल मोहन बिष्ट म्हणाले की, पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी आपल्याला पाठबळ दिले. त्यामुळे त्यांनाच या विजयाचे श्रेय आहे. ते म्हणाले की, गेल्या पाच वर्षांत आपण करावाल नगर येथून आमदार होतो. पण यावेळी आपल्याला वेगळीकडून निवडणूक लढविण्यास सांगण्यात आले. मला जेव्हा वेगळीकडून निवडणूक लढविण्यास सांगण्यात आले तेव्हा मला वाईट वाटले. मात्र मी १७ वर्षांनंतर पुन्हा इथे आलो आहे. मला मुस्तफाबादमधून निवडणूक लढविण्यास सांगण्यात आले तेव्हा पक्षालाही चिंता होती की, काही उन्नीस बीस होईल. पण मला खात्री होती की, मीच जिंकणार. मला वेगळीकडून निवडणूक लढविण्यास सांगण्यात आले तेव्हा मी नाराज झालो कारण मी जिथे अनेक वर्षे काम करतो आहे, तिथे माझी एक नाळ जुळली आहे.
हे ही वाचा:
एकनाथ शिंदे यांच्याकडून शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबीयांना ३२ लाखांची मदत
छत्तीसगडमध्ये चकमक: दोन जवान हुतात्मा, ३१ नक्षली ठार!
इथे झालेल्या २०२०च्या दंगलीबाबत मोहन बिष्ट म्हणाले की, त्या दंगलीबद्दल सांगताना मला खूप दुःख होते. अंकित शर्मा नावाच्या मुलाला इथे मारण्यात आले. एकाचे हात तोडण्यात आले, डोळे काढण्यात आले. दिल्लीत असे मी कधीही पाहिले नव्हते. या दंगलीचे आरोप माझ्यावरही करण्यात आले. पण नंतर न्यायालयाने दिलेल्या निर्णयामुळे तो कलंक पुसला गेला.
बिष्ट म्हणाले की, केजरीवाल यांनी दिल्लीसाठी गेल्या १०-११ वर्षांत काहीही केले नाही. राष्ट्रीय राजधानीला अत्यंत वाईट अवस्थेत त्यांनी आणून सोडले.