34 C
Mumbai
Saturday, March 15, 2025
घरविशेषश्रद्धा वालकरच्या अंत्यसंस्काराची वाट पाहणाऱ्या पित्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू!

श्रद्धा वालकरच्या अंत्यसंस्काराची वाट पाहणाऱ्या पित्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू!

न्यायालयात खटल्याची सुनावणी आहे सुरु

Google News Follow

Related

श्रद्धा वालकर प्रकरण अजूनही लोकांच्या मनात ताजे आहे. मे २०२२ मध्ये श्रद्धा वालकरचा लिव्ह-इन-पार्टनर आफताब अमीन पूनावाला याने तिचा गळा दाबून खून केला होता, त्यानंतर तिच्या शरीराचे ३५ तुकडे केले होते. या घटनेने देशात खळबळ उडाली होती. श्रद्धा वालकरच्या कुटुंबासह संपूर्ण देश न्यायाची वाट पाहत असताना न्यायासाठी लढणारे श्रद्धा वालकर यांचे वडील विकास वालकर यांचा मुंबईत हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुलीच्या मृत्यूनंतर ते मानसिक तणावात होते. मुलीच्या आरोपीला कठोर शिक्षा होईल आणि न्याय मिळेल अशी त्यांना आशा होती. मात्र, न्याय मिळण्याआधीच त्यांची प्राणज्योत मालावली.

मुलीचे अंतिम संस्कार पूर्ण विधींनी करावे अशी विकास वालकर यांची शेवटची इच्छा होती. मात्र, त्यांची ही इच्छा अपूर्ण राहिली. गेल्या ३ वर्षा पासून हे प्रकरण न्यायालयात आहे. अजूनही न्यायनिवाडा झालेला नाही. रविवारी (९ फेब्रुवारी) सकाळी विकास वालकर यांना हृदय विकाराचा झटका आला. त्यांना उपचाराकरिता वसईतील बंगाली येथील कार्डीनल ग्र्यासियास रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मूत्यू झाला. वसईतील संस्कृती अपार्टमेंटमध्ये ते राहत होते. त्यांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.

हे ही वाचा : 

भाजपाच्या विजयी आमदाराने दिल्लीतील मुस्तफाबादचे नाव बदलण्याची केली घोषणा

एकनाथ शिंदे यांच्याकडून शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबीयांना ३२ लाखांची मदत

उत्तर प्रदेश: मदनी मशिदीच्या बेकायदेशीर बांधकामावर बुलडोजर!

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाकुंभमध्ये होणार सहभागी, त्रिवेणी संगमात करणार स्नान!

१८ मे २०२२ रोजी श्रद्धा वालकरची हत्या करण्यात आली होती. मृतदेहाची कोणालाही माहिती होवू नये आणि त्याची विल्हेवाट लावणे सोपे व्हावे म्हणून आरोपी आफताबने तिच्या मृतदेहाचे ३५ तुकडे करत फ्रीजमध्ये ठेवले होते. श्रद्धाची ओळख लपवण्यासाठी आरोपींने तिचा चेहरा जाळला होता. हत्येनंतर आरोपी मृतदेहाचे तुकडे रोज नेवून जंगलात टाकत असे. १९ नोव्हेंबर रोजी आरोपीला अटक करण्यात आली. श्रद्धा वालकरचे वडील विकास वालकर यांनी आरोपी आफताबला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. या प्रकरणात दिल्ली पोलिसांनी आफताबविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत आणि खटल्याची सुनावणी सुरु आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
235,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा