गेल्या अनेक महिन्यांपासून मणिपूरमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर राज्यातून मोठी बातमी समोर आली आहे. एन. बिरेन सिंह यांनी आज (९ फेब्रुवारी) आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. इंफाळमधील राजभवनात राज्यपाल अजय कुमार भल्ला यांची भेट घेत त्यांनी आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा त्यांच्याकडे सुपूर्द केला.
आतापर्यंत मणिपूरच्या लोकांची सेवा करणे हा एक सन्मान आहे. प्रत्येक मणिपूरच्या हिताचे रक्षण करण्यासाठी वेळेवर केलेल्या कृती, हस्तक्षेप, विकासात्मक कामे आणि विविध प्रकल्पांच्या अंमलबजावणीबद्दल मी केंद्र सरकारचा अत्यंत आभारी आहे,” असे सिंह यांनी राज्यपालांना सादर केलेल्या पत्रात म्हटले आहे.
नवी दिल्लीत आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर बिरेन सिंग यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. त्यांच्यासोबत प्रदेश भाजप अध्यक्ष ए शारदा, भाजपचे ईशान्य मणिपूर प्रभारी संबित पात्रा आणि सुमारे १९ आमदार उपस्थित होते. मणिपूर विधानसभेचे अधिवेशन उद्या म्हणजेच १० फेब्रुवारी २०२५ रोजी सुरू होणार होते. विरोधी पक्षही मणिपूर सरकारविरुद्ध अविश्वास प्रस्ताव आणण्याची तयारी करत होता. तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.
हे ही वाचा :
श्रद्धा वालकरच्या अंत्यसंस्काराची वाट पाहणाऱ्या पित्याचा हृदय विकाराच्या झटक्याने मृत्यू!
भाजपाच्या विजयी आमदाराने दिल्लीतील मुस्तफाबादचे नाव बदलण्याची केली घोषणा
एकनाथ शिंदे यांच्याकडून शिरीष महाराज मोरे यांच्या कुटुंबीयांना ३२ लाखांची मदत
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू महाकुंभमध्ये होणार सहभागी, त्रिवेणी संगमात करणार स्नान!
गेल्या वर्षाच्या अखेरीस मुख्यमंत्री बिरेन सिंह यांनी मणिपूरमधील हिंसाचाराबद्दल जनतेची माफी मागितली होती. ते म्हणाले होते की, हे संपूर्ण वर्ष खूप दुर्दैवी गेले. गेल्या ३ मे पासून आज जे काही घडत आहे त्याबद्दल मला खेद व्यक्त करायचा आहे. अनेकांनी प्रियजन गमावले. अनेकांनी आपली घरे सोडली. मला वाईट वाटत आहे. मी माफी मागतो. परंतु, आता आशा आहे की, गेल्या तीन ते चार महिन्यांतील शांततेच्या दिशेने प्रगती पाहिल्यानंतर, २०२५ मध्ये राज्यात स्थिती पूर्ववत होईल, असा विश्वास बिरेन सिंग यांनी व्यक्त केला.
Manipur CM N Biren Singh hands over the letter of resignation from the post of Chief Minister to Governor Ajay Kumar Bhalla at the Raj Bhavan. pic.twitter.com/AOU6MFvScs
— ANI (@ANI) February 9, 2025