27 C
Mumbai
Sunday, October 1, 2023
घरविशेषपंतप्रधान नरेंद्र मोदी जगात भारी ! बायडेन सातव्या क्रमांकावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी जगात भारी ! बायडेन सातव्या क्रमांकावर

‘ग्लोबल लीडर अप्रूव्हल सर्व्हे’मध्ये अव्वल

Google News Follow

Related

पंतप्रधान नरेंद्रमोदी यांची प्रसिद्धी दिवसेंदिवस वाढतच चालली असून एका सर्वेक्षण अहवालामध्ये नरेंद्र मोदी हे अव्वल स्थानी आले आहेत. मॉर्निंग कन्सल्टच्या ‘ग्लोबल लीडर अप्रूव्हल सर्व्हे’मध्ये नरेंद्र मोदी हे जगातील सर्वात लोकप्रिय नेते असल्याची नोंद झाली आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींना ७६ टक्के रेटिंग मिळाले असून हे रेटिंग जगातील कोणत्याही नेत्यापेक्षा सर्वाधिक आहे. या यादीत स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष अलेन बेरसेट हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. तरीही ते पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या तुलनेत १२ टक्के खाली आहेत. विशेष म्हणजे या यादीत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन हे सातव्या क्रमांकावर आहेत. त्यांना ४० टक्के रेटिंग मिळाले आहे. मार्च महिन्यापासूनचे त्यांचे रेटिंग पाहता हा आकडा त्यांचा सर्वोच्च आहे.

 

 

या सर्वेक्षणासाठी ६ ते १२ सप्टेंबर या कालावधीत माहिती गोळा करण्यात आली होती. विशेष म्हणजे या गोळा केलेल्या माहितीमध्ये नरेंद्र मोदींचे नापसंत रेटिंग सर्वात कमी आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नापसंत रेटिंग जगातील सर्वात कमी असून ते केवळ १८ टक्के आहे. तर या यादीतील दहा नेत्यांमध्ये, कॅनडाच्या जस्टिन टुडू यांना सर्वात जास्त ५८ टक्के नापसंतीची रेटिंग आहे. नापसंती रेटिंग ही आकडेवारी आहे ज्यामध्ये सर्वेक्षणात समाविष्ट लोक नेत्यांना नाकारतात किंवा नापसंत करतात.

 

 

मॉर्निंग कन्सल्ट ही राजकीय बुद्धिमत्ता संशोधन संस्था आहे. जगभरातील एकूण २२ नेत्यांवर सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये, दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष यू सिओक-युल आणि झेक प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष पेट्र पावेल यांना सर्वात कमी मंजूरी रेटिंग आहे. त्यांना केवळ २० टक्के रेटिंग आहे.

हे ही वाचा:

गिल खेळला, पण पराभव झाला!

सेंट स्टॅनिस्लॉस हायस्कूल, सेंड अँड्र्यूज कॉलेजला जेतेपद

आदित्य एल-१ने चौथ्यांदा यशस्वीपणे बदलली कक्षा

चंद्रावर पाणी असल्याला पृथ्वीचे वातावरण जबाबदार

अलीकडच्या अशा सर्वेक्षणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी हे गेल्या काही वर्षांपासून सातत्याने या यादीत अव्वल स्थानावर आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अलीकडेच जगातील अनेक देशांना भेटी दिल्या आहेत जिथे त्यांना जागतिक नेत्यांमध्ये खूप आदर मिळाला आहे. नुकत्याच पार पडलेल्या जी २० शिखर परिषदेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाचे आणि भारताचे जगभरातून कौतुक होत आहे. त्यात सहभागी होण्यासाठी आलेल्या जागतिक नेत्यांनीही रशिया-युक्रेन युद्धासह इतर जागतिक समस्यांवर संयुक्त सहमती आणि निवेदन जारी केले. त्यामुळे पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाची जगभरात चर्चा होत आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,844चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
102,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा