25 C
Mumbai
Wednesday, February 18, 2026
घरविशेष‘मोदी युगात भारताचे आर्थिक सशक्तीकरण’ पुस्तकाचे प्रकाशन

‘मोदी युगात भारताचे आर्थिक सशक्तीकरण’ पुस्तकाचे प्रकाशन

Google News Follow

Related

हिमाचल प्रदेशचे राज्यसभेचे खासदार प्राध्यापक (डॉ.) सिकंदर कुमार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मागील ११ वर्षांच्या कार्यकाळात आर्थिक क्षेत्रात मिळवलेल्या यशांवर लिहिलेले ‘मोदी युगात भारताचे आर्थिक सशक्तीकरण’ हे पुस्तक उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते बुधवारी नवी दिल्लीतील उपराष्ट्रपती निवासस्थानात प्रकाशित करण्यात आले. या प्रसंगी उपराष्ट्रपती राधाकृष्णन म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांच्या आर्थिक धोरणांमुळे आज भारत जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला आहे आणि तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था होण्याच्या उंबरठ्यावर आहे. २०१४ पासून मोदी सरकारच्या गव्हर्नन्स धोरणांमुळे भारत २०४७ पर्यंत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येत आहे.

ते म्हणाले की, देशात जीएसटी लागू झाल्यामुळे आज संपूर्ण देश एक समान बाजारपेठ बनला आहे, ज्याचा थेट फायदा लघु, मध्यम व्यापारी आणि शेतकऱ्यांना होत आहे. आज पंजाबचा शेतकरी आपली पिके केरळमध्ये विकू शकतो आणि हिमाचल प्रदेशातील हातमाग व्यापारी आपला माल तामिळनाडूत पाठवू शकतो. तेही सर्व प्रक्रिया घरबसल्या करून. पूर्वी मात्र त्याला स्वतः मालासोबत प्रवास करावा लागत होता. उपराष्ट्रपती म्हणाले की, नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान झाल्यानंतर राज्यांमध्ये जीएसटी लागू करण्यासाठी व्यवहार्य पावले उचलली आणि केंद्र सरकारने राज्यांच्या नुकसानीची भरपाई करण्याची व्यवस्था केली. त्यामुळे देशभरात जीएसटी करप्रणाली सर्वसंमतीने लागू झाली आणि ‘अधिकाऱ्यांचा राज’ संपुष्टात आला.

हेही वाचा..

ख्रिसमसपूर्वी भारतीय शेअर बाजार किंचित घसरणीसह बंद

अणुऊर्जा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याच्या तयारीत जपान

मुस्लिम मतांसाठीच ममता बॅनर्जी बांगलादेशींना पाठिंबा देतात

मोदी सरकारकडून नववर्षाची भेट!

ते पुढे म्हणाले की, शून्य शिल्लक बँक खाती उघडल्यामुळे आज प्रत्येक नागरिकाला बँकिंग सुविधा मिळाली आहे आणि समाजातील खालच्या स्तरातील लोकांच्या खात्यांत आज कोट्यवधी रुपये जमा झाले आहेत. यामुळे केंद्र व राज्य सरकारांच्या अनुदान योजना थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होत आहेत आणि दलाल व मध्यस्थांची भूमिका संपली आहे. सुरुवातीला काही राज्य सरकारांनी या प्रणालीला विरोध केला होता; पण आता तीच सरकारे डीबीटीच्या माध्यमातून आपल्या नागरिकांना लाभ देत आहेत.

त्यांनी सांगितले की, आर्थिक क्षेत्रात पंतप्रधान मोदी यांनी धाडसी आणि निर्णायक पावले उचलली असून डीबीटीद्वारे ४७ लाख कोटी रुपये थेट लाभार्थ्यांच्या खात्यांत हस्तांतरित झाले आहेत. आज शेतकऱ्यांना जमिनीच्या अधिग्रहणासाठी पूर्वीपेक्षा तीनपट दर दिला जात आहे. समाजातील दुर्बल घटकांसाठीच्या मोफत योजना या मतपेढीसाठी नसून सामाजिक सुरक्षिततेसाठी आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. ते म्हणाले की, राष्ट्रीय वीज जाळे (नॅशनल ग्रिड) तयार झाल्यामुळे देशभरात वीज कपात संपुष्टात आली असून जनरेटर युगही संपले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या धोरणांमुळे परकीय गुंतवणूक झपाट्याने वाढत असून त्यामुळे कोट्यवधी रोजगार निर्माण होतील आणि नव्या आर्थिक क्रांतीची सुरुवात होईल.

त्यांनी लेखक प्रा. (डॉ.) सिकंदर कुमार यांच्या मेहनतीचे कौतुक करत सांगितले की, हे कार्य इतरांसाठी प्रेरणादायी ठरेल आणि समाजाला पंतप्रधान मोदींच्या कार्याच्या विविध पैलूंची माहिती देईल. यावेळी प्रा. सिकंदर कुमार म्हणाले की, पंतप्रधान मोदी सत्तेत आले तेव्हा महागाई दर १० टक्के होता, राजकोषीय तूट ४.१ टक्के होती आणि रोजगाराच्या संधी अत्यल्प होत्या. आज मात्र देश ७ ते ८ टक्के विकासदर नोंदवत आहे. उत्पादन क्षेत्राचा जीडीपीतील वाटा १५.७ टक्क्यांवरून १७ टक्के झाला असून तो २०३० पर्यंत २५ टक्क्यांपर्यंत वाढेल. ते म्हणाले की, सध्या देशात २२० गिगावॅट नवीकरणीय ऊर्जेचे उत्पादन होत आहे. केवळ २०२५ या वर्षातच १७३ अब्ज यूपीआय व्यवहारांद्वारे २२ लाख कोटी रुपये व्यवहार झाले. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यकाळात ७४८ अब्ज अमेरिकी डॉलर इतकी परकीय गुंतवणूक आली असून त्यामुळे १७ कोटी नवी रोजगारनिर्मिती झाली आहे.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
292,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा