‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांकडून विचारले जात असलेले प्रश्न निरर्थक असल्याचे मत माजी भाजप खासदार व भारतीय कुस्ती संघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांनी व्यक्त केले आहे. त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या *‘बौद्धिक क्षमते’*वरही उपरोधिक टीका केली. गोंडा येथील आपल्या गृहगावी पत्रकारांशी बोलताना बृजभूषण म्हणाले, “भारताचा पराभव झाला, किंवा देशाची परराष्ट्र धोरणे अपयशी ठरली तर राहुल गांधींना अभिमान वाटेल का? भारताचे लढाऊ विमान अपयशी ठरले, तर त्यांच्या प्रश्नावर देश त्यांच्याशी उभा राहील का? कोणत्या वेळेला कोणता प्रश्न विचारायचा हे त्यांना समजत नाही.
बृजभूषण यांनी टोला लगावत म्हणाले, “सूप बोले तो बोले, चलनी बोले जेकरे में बहत्तर छेद। १९७१ मध्ये काँग्रेसने ९२ हजार पाकिस्तानी सैनिकांना सोडले होते. आपण त्यांना आठ महिने बसवून खायला दिले आणि नंतर कोणत्याही अटींशिवाय सोडून दिले. ज्या समस्येमुळे ऑपरेशन सिंदूर सुरु झाले ती समस्या ही काँग्रेसची देण आहे. राहुल गांधींनी अशा प्रश्नांची विचारणा योग्य व्यासपीठावर करावी.
हेही वाचा..
मधाचे उत्पन्न वाढल्याने पंतप्रधान खुश
इंदौरमध्ये जीर्ण इमारतींवर बुलडोजर
चार राज्यांमधील ५ विधानसभा जागांसाठी पोटनिवडणुकांची घोषणा!
राजस्थानमधून आणखी एक गुप्तहेर कासीमला अटक!
भारतीय कुस्ती संघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण यांनी दावा केला की सरकारकडून कुस्ती संघाला पूर्ण सहकार्य मिळत आहे. ते म्हणाले, “कुस्तीवरील संकटाचे ढग आता दूर झाले आहेत आणि भारतीय कुस्ती संघाला भारत सरकारचा संपूर्ण पाठिंबा मिळत आहे. आता कोणतीही अडचण नाही आणि भारतीय कुस्ती पुन्हा बुलंद शिखर गाठेल. आशियाई अजिंक्यपद स्पर्धा व्हिएतनाममध्ये होणार असून, त्यासाठी खेळाडू जोमाने तयारी करत आहेत. कुस्ती अनेक दिवसांपासून ठप्प होती, त्यामुळे अनेक विद्यार्थी निराश झाले होते. आता पुन्हा कुस्तीची गाडी रुळावर येत आहे. सरकार आणि संघटनेमध्ये आता कोणताही मतभेद नाही.
भारतीय कुस्ती महासंघ (WFI) गेल्या काही महिन्यांपासून अनिश्चिततेत अडकले होते. ऑगस्ट २०२३ मध्ये युनायटेड वर्ल्ड रेसलिंगने WFI वर बंदी घातली होती, कारण संघटनेच्या निवडणुका वेळेत झाल्या नव्हत्या. त्यानंतर डिसेंबर २०२३ च्या अखेरीस संजय सिंह यांची WFI चे अध्यक्ष म्हणून निवड झाली, पण त्यानंतरही क्रीडा मंत्रालयाने WFI मध्ये सुरू असलेल्या अनिश्चिततेमुळे संघटनेला निलंबित केले.
